
कोपरगाव प्रतिनिधी:-
“कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव, प्रसिद्ध विधिज्ञ व शिक्षण तज्ञ ऍड. संजीव कुलकर्णी यांच्या The Earth : Beginning of the End या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ शनिवार दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी ९.०० वाजता मा. न्यायाधीश सयाजी बापुराव कोऱ्हाळे, मा. न्यायाधीश भुजंग मुकुदराव पाटील, लेफ्ट. कर्नल नरैन दास, मा. प्रो. (डॉ.) प्रवीण सप्तर्षी (पुणे) यांच्या शुभहस्ते व कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.” अशी माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी येथे दिली.
याप्रसंगी उपस्थित असलेले कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त मा. संदीपभाऊ रोहमारे म्हणाले की The Earth : Beginning of the End हा ग्रंथ म्हणजे, ऍड. संजीव कुलकर्णी यांच्या प्रदीर्घ अनुभव, व्यासंग, वाचन व ग्लोबल वॉर्मिंग तसेच पर्यावरण शास्त्रावरील चिंतनाची फलश्रुती आहे. त्यामुळे आजच्या तरुण पिढीने व पर्यावरण क्षेत्रात भरीव कार्य करू इच्छिणाऱ्या तसेच रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहून आम्हाला उपकृत करावे.”
