SJS (श्री जनार्दन स्वामी) हॉस्पिटल मध्ये दोन दिवसाच्या बाळाची शस्त्रक्रिया यशस्वी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
मागील आठवड्यात नवजात मुलाला घेऊन पालक व नातेवाईक sjs हाॅस्पिटलला दाखल झाले. सदर बालकाला जन्म झाल्याच्या दुस-या दिवसापासून हिरवी उलटी होणे चा त्रास होत होता. जन्मतः शीची जागा नसल्याने बाळास मल शरिराबाहेर पडण्यास मार्गच नव्हता. दोन तीन हाॅस्पिटल ने नाकारल्यावर बाळास घेऊन नातेवाईक sjs हाॅस्पिटल ला आले. येथील निष्णात बालरोगतज्ञ डाॅ. अनंतकुमार भांगे यांनी योग्य त्या तपासण्या करून संपूर्ण निदान केले. नवजातशिशू शस्त्रक्रियातज्ञ डाॅ. अनिता गांगुर्डे – जाधव, भूलतज्ञ डाॅ. विजय कर्डिले यांनी यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली. डाॅ. भांगे डॉ हर्षला रक्ताटे, डॉ स्वलिया पठाण यांनी शस्त्रक्रिया नंतर काळजी घेतली. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया मोफत पार पाडली. यामधे हॉस्पिटल डॉ नवजात शिशू अतिदक्षता विभागाचे सर्व कर्मचारी वर्ग व पॅथोलाॅजी विभाग प्रमुख. श्री शरद अनारसे यांचे खूप सहकार्य मिळाले..तसेच मागील महिन्या मध्ये अनुभवी डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाने विविध प्रकारच्या एकूण 178 शस्त्रक्रिया करण्यात आल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *