मूल्यशिक्षणाची कार्यशाळा म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना- प्रा. डॉ. प्रताप फलफले…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- “ देश सेवेसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याच्या उद्देशाने अंमलात आलेली राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे महाविद्यालयातील मूल्यशिक्षणाची कार्यशाळाच आहे . हे लक्षात घेऊन स्वयंसेवकांनी स्वतःच्या विकासाबरोबर समाजाचे हित कशात आहे याचा शोध घ्यावा व त्यातून सक्षम भारताची निर्मिती घडून आणावी असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे नोडल ऑफिसर प्रा . डॉ . प्रताप फलफले यांनी केले . येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस . एस . जी . एम . महाविद्यालयात झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते . राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वरूप आणि महत्व विशद करताना त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची गरज , नीती मूल्य , शाश्वत विकास याविषयीही मार्गदर्शन केले . 1 . कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्र . प्राचार्य डॉ . सानप आर . आर . यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागात जाऊन ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छता , आरोग्य या विषयाचे महत्त्व पटवून द्यावे , ग्रामीण व्यसनाधीनता कमी करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले . तसेच सध्याच्या काळात असलेले स्वयंरोजगाराचे महत्त्व पटवून दिले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ . बी . ए . तहाळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा . एम . के . दिघे यांनी मानले . या कार्यक्रमासाठी प्रा . डॉ . प्रतिभा रांधवणे , डॉ . बी . एम . वाघमोडे , प्रा . डॉ . एस . बी . रणधीर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . डॉ . सीमा चव्हाण व कुमारी अक्षदा भोसले यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *