

गायरान जमिनीवरील अतिक्रमणधारकांचा प्रश्न कॅबिनेटमध्ये मांडणार…
कोपरगाव प्रतिनिधी:- स्नेहलताताई कोल्हे, तुम्ही अजिबात चिंता करू नका. आज जरी तुम्ही कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नसल्या तरी आजपासून तुम्हीच आमदार आहेत, असे समजून काम करा. तुमच्या मतदारसंघात ज्या काही समस्या असतील त्या सोडविण्यासाठी सरकार सर्व शक्तीनिशी तुमच्या पाठीशी उभे राहील. कोपरगाव मतदारसंघातील विविध प्रश्न मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडून ते सोडविण्यासाठी आग्रह धरणार आहे. स्नेहलताताई कोल्हे यांचा आवाज शासनदरबारी बुलंद करणार आहे. गायरान जमिनीवरील अतिक्रमधारकांचा प्रश्न मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून तो सोडविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करीन, असे ठोस आश्वासन राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले.
वन व सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी येसगाव येथील कोल्हे वस्तीवर भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, डॉ. मिलिंददादा कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे, संजीवनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुमितदादा कोल्हे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविकाका बोरावके, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्तात्रय काले, सचिन तांबे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, शहराध्यक्ष अविनाश पाठक आदींची यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आदरांजली अर्पण केली. युवा नेते विवेकभैय्या कोल्हे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरदनाना थोरात तसेच त्र्यंबकराव सरोदे, साईनाथ रोहमारे, अरुणदादा येवले, मच्छिंद्र टेके आदींनी ना. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार केला.
ना. सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले, जनतेच्या आशीर्वादाने आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जनतेचे सरकार सत्तेवर आले आहे. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने १६१ जागा जिंकल्या होत्या. २ कोटी ३० लाख ५८ हजार ५२५ मतदारांनी आपल्याला मते देऊन आपल्या बाजूने कौल दिला होता; पण आपल्यासोबत बेईमानी झाली. मध्येच एक ‘चकवा’ आला आणि तो आपल्यासोबतच्या एका मित्राला घेऊन गेला. त्यामुळे आपण दोन-अडीच वर्षे सत्तेत नव्हतो. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जनतेचे हक्काचे सरकार सत्तेवर आले आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतीचे, पाण्याचे आणि इतर जे काही प्रश्न असतील ते नक्कीच सोडविले जातील. विवेकभैय्या कोल्हे यांनी मला सांगितले की, या मतदारसंघातील शेतकरी अतिशय कष्टाळू आहे. तो कष्ट करण्यात मागे नाही; पण या शेतकऱ्यांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. या मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकार निश्चितच करेल. उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. मी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना मुद्दाम सांगेन की, सरकार किती दिवस चालेल हे महत्त्वाचे नाही तर सरकारने लोकांची मनं कशी जिंकली हे महत्त्वाचे आहे. निवडणुका जिंकणे हे आमचे लक्ष्य असू नये तर गरीब लोकांचे हृदय जिंकणे हे या भावनेतून तुम्ही-आम्ही सर्वांनी काम करायला हवे.
शासकीय गायरान जमिनींवरील अतिक्रमणे हटविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने व मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. या आदेशानुसार महसूल विभागाने कोपरगाव तालुक्यातील १७ गावांतील सुमारे ९०३ नागरिकांना गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून गायरान जमिनीवर राहणाऱ्या या नागरिकांना राहण्यासाठी दुसरी कोणतीही जागा उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांची अतिक्रमणे न हटवता ती नियमानुकूल करून त्यांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी याप्रसंगी केली. स्नेहलताताई कोल्हे यांनी केलेल्या या मागणीचा उल्लेख करून ना. सुधीर मुनगंटीवार यांनी उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रश्न मांडून त्याबाबत सकारात्मक निर्णय होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. लोकांचे प्रश्न सोडविणे हे सरकारचे काम आहे, प्रश्न निर्माण करण्याचे नाही. भारतमाता माझी आई आणि डोके टेकवायला जागा नाही, असे जर झाले तर गडबड होईल. म्हणून मी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना मुद्दाम सांगेन की, हा निरोप जरी कोपरगाव, शिर्डी परिसरातील जनतेने दिला असला तरी तो श्री साईबाबांचा संदेश आहे. हा प्रश्न सुटण्यासाठी मी सदैव तुमच्यासोबत आहे, असेही त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यानंतर सेवेचे, देशाच्या प्रगतीचे विकासाचे राजकारण केले जात होते; प मध्यंतरीच्या काळात विकासाचे राजकारण बाजूला पडून स्वार्थाचे राजकारण सुरू झाले. देशभक्तीचा विचार मागे पडला. परिवारभक्ती सुरू झाली; देशात अनेक परिवार निर्माण झाले. ‘मेरा परिवारही मेरा देश है,’ अशी भावना निर्माण झाली आणि याच विपरीत काळात विश्वगौरव नरेंद्रभाई मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली देशात प्रगतीचे, उन्नतीचे, जनसेवेचे पर्व सुरू झाले आहे. ‘मेरा देशही मेरा परिवार है’ या भावनेतून पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे देशवासीयांची सेवा करत आहेत. भारताला खूप मोठा सांस्कृतिक वारसा आहे. आपला देश संत, महंतांची भूमी आहे. बाकी पक्ष हे परिवाराचे पक्ष आहेत. भाजप हा एक परिवार आहे व हे या पक्षाचे वैशिष्ट्य आहे. आमचे एकच गोत्र आहे भारतमाता. काही लोक स्वत: चुका करून दुसऱ्याला दोष देत पक्ष कमजोर करण्याचे काम करत असतात. अशा लोकांपासून तुम्ही सावध राहा. भाजपचा विचार हा फक्त एका मतदारसंघापुरता मर्यादित नाही, तर तो विशाल आहे. आपल्याला देशभक्तीचा विचार पुढे नेत भारताला वैभवशाली बनवायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितल्याप्रमाणे बुथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व सर्व कार्यकर्त्यांनी भाजपला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत. ब्रिटनमध्ये नेलेली छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार भारतात परत आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.

यावेळी अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक विश्वासराव महाले, बापूसाहेब बारहाते, बाळासाहेब वक्ते, विलासराव वाबळे, बाळासाहेब पानगव्हाणे, अरूणदादा येवले, माजी पं.स. सभापती मच्छिंद्र टेके, मच्छिंद्र केकाण, शिवाजीराव वक्ते, नारायणशेठ अग्रवाल, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पाठक, विजय वाजे, स्वप्नील निखाडे, माजी सभापती सुनिल देवकर, माजी नगरसेवक बबलू वाणी, जनार्दन कदम, भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा प्रभारी विनोद राक्षे, रिपाइंचे प्रदेश सचिव दीपक गायकवाड, वैभव गिरमे, प्रसाद आढाव, वैभव आढाव, सोमनाथ म्हस्के, सतीश रानोडे, विजय चव्हाणके, शंकर बिऱ्हाडे, गोपीनाथ गायकवाड, दिनेश कांबळे, बापू पवार, रवींद्र रोहमारे, दीपक जपे, अशोक लकारे, संदीप ढोमसे, पिंकी चोपडा, अल्ताफभाई कुरेशी, चंद्रकांत वाघमारे, विवेक सोनवणे, राजेंद्र बागुल, वासुदेव शिंदे, मुक्तारभाई पठाण, जगदीश मोरे, संजय तुपसैंदर, रोहित कनगरे, प्रशांत कडू, संदीप देवकर, रहीमभाई शेख, गोरख देवडे, हुसेन सय्यद, सद्दामभाई सय्यद, खालिकभाई कुरेशी, नसीर सय्यद, राजेंद्र लोखंडे, आसिफभाई शेख, इलियासभाई खाटिक, अहमद बेकरीवाले, अमोल बागुल, स्वराज सूर्यवंशी, प्रमोद नरोडे, रवींद्र नरोडे, चांगदेव कोळपकर, आकिश बागवान, राजेंद्र गंगुले, पंकज मोरे, अण्णा खरोटे, ॲड. अशोक टुपके, शशिकांत दरपेल, सतीश चव्हाण, जितेंद्र रणशूर, महावीर दगडे, रवींद्र शेलार, सिद्धार्थ साठे, कैलास खैरे, आकाश खैरे, भैय्या नागरे, अंकुश जोशी, संतोष साबळे, महेंद्र नाईकवाडे, संतोष पगारे, सुशांत खैरे, रवींद्र लचुरे, बाळासाहेब राक्षे, विकी साटोटे, अनिल जाधव, नारायण गवळी, अल्ताफ पठाण, कुणाल आमले, नरेंद्र लकारे आदींसह संजीवनी उद्योग समुहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक, भाजप बुथ व शक्ती केंद्रप्रमुख, आजी-माजी सरपंच व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विश्वासराव महाले यांनी तर आभारप्रदर्शन विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.
