लायन्स इंटरनॅशनल च्या विभागीय परिषदेमध्ये कोपरगाव क्लबचा विशेष सन्मान…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
लायन्स इंटरनॅशनल ही एक जागतिक स्तरावरील सामाजिक संघटना असून जगामध्ये सध्या 50000 क्लब आहेत व 14 लाख या संघटनेचे सभासद आहेत. डिस्ट्रिक्ट 32 34 D2 मधील नगर रिजन ची विभागीय परिषद 22 मे 2022 रोजी अहमदनगर जिमखाना एमआयडीसी या ठिकाणी रिजन चेअरमन संतोष जी माणकेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी प्रांतपाल हेमंत नाईक, राजेश कोठावडे, सुनील चेकर, गिरीश मालपाणी हे प्रमुख उपस्थित होते. तसेच झोन चेअरमन एकनाथ गोंदकर आणि श्रीनिवास पगडाल हेही उपस्थित होते.


स्नाईडर इलेक्ट्रॉनिक्स डायरेक्टर अरविंदजी पारगावकर हे प्रमुख वक्ते मिळाले. यावेळी नगर मधील सर्व क्लब याशिवाय शिर्डी, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, पाथर्डी,व राहुरी अशा विविध 16 क्लबचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


नगर रिजनचे या वर्षाचे ब्रीदवाक्य “थिंक ग्लोबल बट रिऍक्ट लोकल” असे होते. आणि हीच संकल्पना ठेवून नगर रिजन मधील सर्व क्लबने देशपातळीवरील आणि स्थानिक पातळीवरील समस्या लक्षात घेऊन त्यावर अतिशय सुंदर रित्या सामाजिक कार्य केले आहे. आणि म्हणून या ठिकाणी सर्व क्‍लबचा गौरव करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये बॅनर प्रेझेंटेशन मध्ये लायन्स क्लब कोपरगाव ला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. तसेच मल्टिपल 32 34 मध्ये इन्व्हरमेंट प्रोटेक्शन याविषयावर लायन्स क्लब ऑफ कोपरगाव ने अतुलनीय अशी कामगिरी केल्याबद्दल लायन्स क्लब ऑफ कोपरगावचा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. याशिवाय लायन्स क्लब ऑफ कोपरगाव व लिओ क्लब कोपरगाव या दोन्ही टीम ने वर्षभर अतिशय उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल लायन्स अध्यक्ष राम थोरे, सचिव अक्षय गिरमे, खजिनदार सुमित भट्टड तसेच लिओ अध्यक्ष आदित्य गुजराती, सचिव पृथ्वी शिंदे खजिनदार ध्रुव कुदळे यांना ट्रॉफी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. याशिवाय संपूर्ण डिस्ट्रिक मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तुलसीदास खुबानी, सुधीर डागा,अभिजीत आचार्य, विजय गवांदे, प्रसाद भास्कर, प्रशांत भास्कर, राहुल नाईक, रोहित काले, यांचाही सत्कार या परिषदेमध्ये करण्यात आला.


लायन्स क्लब ऑफ कोपरगाव ने वर्षभर जे काही सेवाकार्य केले आहे त्या कार्याचे फळ या विभागीय परिषदेमध्ये भरभरुन मिळाले अशी प्रतिक्रिया लायन्स क्लब कोपरगावचे अध्यक्ष राम थोरे यांनी दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन डॉक्टर अभिजित आचार्य व श्रीकांत मांढरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *