कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर – विद्यार्थी दशेत घेतलेल्या शिक्षणातून कुटुंबाला आर्थिक हातभार लागला पाहिजे. त्यासाठी पारंपारिक शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षण देखील महत्वाचे आहे. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये व्यावसायिक शिक्षणाला मोठ्या प्रमाणावर महत्व देण्यात आले आहे. त्यामुळे कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी पारंपारिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षणावर देखील भर देणार असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (दि.२६) रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी ते बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे होते. यावेळी पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी ग्रामीण भागातील गोर गरीब शेतकरी, कष्टकरी मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. मागील दोन वर्षापूर्वी आलेल्या कोविड संकटाने आपल्याला खूप काही शिकविले आहे. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता टिकवून व्यावसयिक शिक्षणावर देखील पर्याय उपलब्ध करून देवून स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकला पाहिजे यासाठी भविष्यात व्यावसायिक शिक्षणावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वप्रथम एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक स्व.शंकररावजी काळे साहेब व स्व.सौ.सुशीलामाई काळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.सभेच्या अध्यक्ष पदाची सूचना अशोकराव मुरलीधर काळे यांनी मांडली. सदर सूचनेस एम. टी. रोहमारे यांनी अनुमोदन दिले. श्रद्धांजलीचा ठराव माजी विश्वस्त एम.टी.रोहमारे यांनी मांडला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष छबुराव आव्हाड, विश्वस्त कारभारी आगवण, सय्यद सिकंदर चाँद पटेल, किसनराव पाडेकर, बाबासाहेब कोते, एम.टी. रोहमारे, राजेंद्र घुमरे, ज्ञानदेव मांजरे, राधुजी कोळपे, उत्तमराव औताडे, प्रविण शिंदे, तसेच रामराव गवळी, मधुकर घुमरे, दिनकर काजळे, मच्छिंद्र देशमुख आदी मान्यवरांसह सर्व शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य व मुख्याध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन केशव दळवी यांनी केले तर आभार कारभारी आगवण यांनी मानले.

फोटो ओळ:- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलतांना आमदार आशुतोष काळे, सभेचे अध्यक्ष मा.आ. अशोकराव काळे, उपाध्यक्ष छबुराव आव्हाड आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *