

कोपरगाव प्रतिनिधी:-
गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरा मध्ये ऐतिहासिक उपक्रमाचे झाला आहे
या उपक्रमाचे अनेक भाविक साक्षीदार होते . गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर व शुक्राचार्य महाराज यांची माहिती व महतीच सांगणारे देवस्थान अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड लिखित ” शुक्र तीर्थ ” या पुस्तकाचे ऑडियो बुक ( Audio Book ) चे लॉन्चिंग कोपरगांव चे लोकप्रिय P I श्री देसले साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले . ” शुक्र तीर्थ ” हे पुस्तक अत्यंत लोकप्रिय असलेले आणि एक कोटी पेक्षा जास्त लोकांनी subscribe केलेल्या प्रसिद्ध अश्या ” Storytel ” या ॲप वर आता ऑडियो ( Audio ) मध्ये उपलब्ध झाले आहे . त्यास प्रसिद्ध कलाकार श्री सचिन सुरेश यांनी आपला सुंदर आणि भारदस्त आवाज दिलेला आहे . या प्रसंगी देवस्थान ट्रस्ट चे वतीने श्री देसले साहेब यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सुरवातीस श्री भागचंद रुईकर यांनी प्रास्ताविक केले , श्री बाळासाहेब आव्हाड यांनी Storytel aap व पुस्तकाविषयी माहिती सांगितली या नंतर उद्घाटक श्री देसले साहेब यांनी अतिशय सुंदर असे मार्गदर्शन केले , श्री राजेन्द्र ( मुन्ना ) आव्हाड यांनी आभार प्रदर्शन केले .


या प्रसंगी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड , श्री संजय वडांगळें, दत्तात्रय सावंत , मधुकर साखरे , ॲड नितीन भवर , दिलीप सांगळे , भागचंद रुईकर , मुन्ना आव्हाड , बाळासाहेब लकारे , बाळासाहेब जंगले , ओंकार आव्हाड , पत्रकार मंडळी व सर्व मंदिर कर्मचारी उपस्थित होते .
या प्रसंगी सर्वांनी या Storytel ॲप डाऊनलोड करून गुरू शुक्राचार्य महाराजां वर आधारित ” शुक्र तीर्थ ” या पुस्तकाचा ऑडियो बुक स्वरूपात अवलोकन करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले


