कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- वैश्विक कोरोना संकटात छोट्या व्यावसायिकांना घालण्यात आलेली बंधने आजही कायम असून हि बंधने शिथिल करून या व्यावसायिकांना पूर्वीप्रमाणेच सायंकाळी सहा वाजल्यानंतर देखील हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार (दि.१२) रोजी हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना येत असलेल्या अडचणींची दखल घेवून पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मागील वर्षी संपूर्ण जागत धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना संकटामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे आर्थिक चक्र थांबले होते. जून महिन्यापासून महाविकास सरकारने अनलॉक सुरु करून हळूहळू एकेक व्यवसाय सुरु करून वेळेचे बंधन घालून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या आवश्यक उपाय योजना करून व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली. पुढे हळहळू या सर्व नियमात बदल करून व्यवसायाच्या वेळेत देखील बदल करण्यात आले. मात्र हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना आज देखील सहा नंतर आपले व्यवसाय आटोपते घ्यावे लागतात त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. आजरोजी कोरोनावर राज्यासह कोपरगाव शहरात देखील चांगल्यापैकी नियंत्रण मिळविले असून छोटे-मोठे व्यावसयिक व नागरिक देखील कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी चांगल्या प्रकारे काळजी घेत आहे. त्यामुळे कोपरगाव शहरात संध्याकाळी ६ वाजेनंतर देखील हातगाडीवर हॉटेल व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना कोरोना काळात घालण्यात आलेली बंधने शिथिल करून पूर्वीप्रमाणे व्यवसाय करण्यासाठी वेळ वाढवून द्यावा अशी मागणी दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी कॉंग्रेच्या वतीने करण्यात आली आहे. कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने हातगाडीवर हॉटेल व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना येत असलेल्या अडचणींची दखल घेतल्यामुळे या व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
यावेळी कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नवाज कुरेशी, संदीप कपिले, सागर लकारे, संतोष नजन, एकनाथ गंगूले, शिवा लकारे, संतोष दळवी, विजय नागरे, संतोष बारसे, नाना लाल जोशी, अमजद शेख, वसीम शेख, विरेश गोरखा, जुबेर शेख, जाकीर कोथमिरे, वकील शेख, ज्ञानेश्वर गंडे, अंबादास वाघ, बाळासाहेब सुपेकर आदी उपस्थित होते.
चौकट:- कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरात कोरोना साथ आटोक्यात आली असून व्यावसायिकांना देण्यात आलेली सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंतची मुदत वाढवून या व्यावसायिकांना रात्री अकरा वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली असून पुणे शहरात हॉटेल व्यावसायिकांना रात्री एक वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी दिली असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या निदर्शनास आणून दिले.

फोटो ओळ- सायंकाळी सहा वाजल्यानंतर देखील हातगाडी व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी द्या अशा आशयाचे निवेदन पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना देतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते.
