
कोपरगाव प्रतिनिधी:- येथील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांची सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याची माहित संजय काळे यांनी स्वतः दिली आहे. याबाबत अधिक अधिक माहिती अशी कि कोपरगावासह राज्यातील विविध प्रश्नावर संजय काळे यांनी वेळोवेळी आवाज उठविला आहे . त्याच प्रमाणे माहितीच्या अधिकाराखाली अनेक शासकीय कामातील अनियमितता जनतेसमोर उघड केली आहे. अशाच एका प्रकरणात कोपरगाव शहरातील पालखी रस्त्याचे काम सुरु असताना २१/१०/२०२१ रोजी रस्त्याच्या कामाचा दर्जा ठीक नसल्याची तक्रार काळे यांनी केली असता त्यांच्यावर कोपरगाव नगर परिषदेकडून सरकारी कामात अडथळा आणल्याचा उन्हं नोंदविण्यात आला होता . त्याचा निकाल काल लागून काळे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली .
याबाबत प्रतिक्रया देताना काळे म्हणाले कि कोपरगाव दैत्यांची भूमी म्हणून प्रसिध्द आहे..१८ ऑक्टोबर २०१५ कोपरगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने काळा दिवस ठरला आहे कारण त्यादिवशी कोपरगाव शहरात दोन कोटी रूपये खर्चून पालखी रस्त्याचे काम चालू होते.. काम चांगले व्हावे म्हणून मी वारंवार लक्ष ठेऊन सुचना करीत होतो. त्यावेळी दोन माजी नगराध्यक्षांनी मला कामाच्या ठिकाणी पांडे स्विट समोर बोलावले .. जेथे २०१५ पासून खड्ड्यांचे साम्राज्य होते व आजही आहे. या दोन माजी नगराध्यक्षांनी मला शिव्या देऊन माझा कार्यक्रम करण्याची धमकी दिली. याबाबत मी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली व गुन्हा दाखल केला.. याउलट या दोन माजी नगराध्यक्षांनी माझ्या विरूध्द खोटी तक्रार करून माझ्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्या सोबत पक्षाचे सर्व नगरसेवक पोलीस ठाण्यात हजर होते.. सगळे विकास करणारे {? }माझ्या विरूध्द एकत्र आले होते .ज्या गावाच्या भल्यासाठी मी लढत होतो त्या ६५००० लोकसंख्येच्या गावात मला खरच माजी नगराध्यक्षांनी शिव्या दिल्या हे सांगायला एक साक्षीदार पुढे आला नाही .या उलट राजकीय नेते एकवटले व २१/१०/२०२१ रोजी तीन दिवसांनी माझ्यावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून आणखी एक खोटा गुन्हा दाखल केला.. शहर पोलीस ठाण्यात कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी आले व त्यांनी खोटा एक गुन्हा मागे घेतला.. पण दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयात दोषारोप दाखल झालेले होते म्हणून गेली पाच वर्षे मी न्यायालयात हेलपाटे मारत होतो. सर्व साक्षी पुरावेच्या आधारे आज अखेर न्यायालयाने मला ह्या खोट्या गुन्ह्यातून निर्दोष घोषीत केले.. पण कोपरगावचे खूप हरवले.
ज्या रस्त्यांच्या दर्जा व इतर कामांवर मी आक्षेप घेत होतो ती सर्व कामे तत्कालीन सहमती एक्सप्रेसने नावालाच पूर्ण केली व आपली तुंबडी भरली . मात्र त्यावेळी तयार झालेल्या बँक रस्ता , एस जी विद्यालय रस्ता, इंदीरा पथ, साई कॉर्नर ते आण्णाभाऊ साठे रस्ता, गुरूद्वारा रस्ता, आचारी हॉस्पीटल आदी रस्ते नावालाच झाले या सहमती एक्सप्रेसने रस्त्यांचीच नव्हे तर शहराच्या विकासाची कायमची वाट लागली आहे. मात्र बोलणार कोण ? अंधेर नागरी चौपट राजा !
