संजीवनी युवा प्रतिष्ठानकडुन मोफत चष्म्यांचे वाटप…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे निमीत्ताने सालाबादप्रमाणे याही वर्षी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्यातील रुग्णांना संजीवनी युवा प्रतिष्ठाच्यावतीने भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते चांदेकसारे येथे मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले, अध्यक्षस्थानी माजी संचालक संजय होन होते.
प्रारंभी माजी सरपंच केशव होन यांनी प्रास्तविक केले, संचालक ज्ञानेश्वर होन यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. यावेळी स्थानिक विकास निधीतून २५ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते करण्यात येऊन त्याचे नामकरण स्व. शंकरराव कोल्हे सामाजिक सभागृह केले. चांदेकसारे ग्रामपंचायत अंतर्गत गेल्या दोन वर्षात ३५ लाख ८४ हजार रुपये खर्चाच्या पूर्ण झालेल्या विकास कामांचे लोकार्पण तसेच ३३ लाख ८७ हजार रुपये खर्चाच्या कामांचा शुभारंभ सौ स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.
सौ. स्नेहलताताई कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाल्या की, संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी क्रांती केली, त्यातून गोर-गरीबांचे कल्याण केले. बिपीनदादा कोल्हे हे त्यांचा वाढदिवस शाल-श्रीफळ सत्कार न घेता, समाजाप्रती आपण काही तरी देणं लागतो म्हणून हुशार – गोर-गरीब मुला-मुलींना मोफत शालेय वह्यांचे वाटप गेल्या१३ वर्षापासून सुरू आहे व संजीवनी उद्योग समुह, नीलवसंत फाउंडेशन, संजीवनी युवा प्रतिष्ठान व मणिशंकर आय हॉस्पीटल यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे कोपरगांव विधानसभा मतदार संघात आयोजन करतात या शिबीरात हजारो रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करून मोतीबिंदू शस्त्रक्रियाही केल्या जातात. चांदेकसारे पंचक्रोशीतील रुग्णांना गुरुवारी मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम गोरगरिबांसाठी पर्वणी असल्याच्या प्रतिक्रिया अनेक रुग्णांनी यावेळी व्यक्त केल्या.
याप्रसंगी ह. भ. प. अंकुश महाराज जगताप, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक निवृत्ती बनकर, विश्वासराव महाले, ज्ञानदेव औताडे, रमेश आभाळे, बापुसाहेब बाराहाते, बाळासाहेब वक्ते, निलेश देवकर, शिवाजीराव वक्ते, अरुणराव येवले, अशोकराव औताडे, आप्पासाहेब औताडे, कामगार नेते मनोहर शिंदे, गणपत दवंगे, रावसाहेब होन, आप्पासाहेब होन, द्रोणाचार्य होन, प्रल्हाद पवार, दगुराव शेख, जालीदर चव्हाण, सरपंच पुनम खरात, उपसरपंच विजय होन, प्रा. रामनाथ नन्नवरे, चंद्रकांत औताडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, चांदेकसारे पंचक्रोशीत नागरीक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

फोटो ओळी:- कोपरगाव
सालाबादप्रमाणे याही वर्षी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे निमीत्ताने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्यातील रुग्णांना संजीवनी युवा प्रतिष्ठाच्यावतीने भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते चांदेकसारे येथे मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *