
कोपरगाव प्रतिनिधी:-
बँक ऑफ इंडियाच्या ११७ वा वर्धापनदिनानिमित्त कोपरगाव शाखेमध्ये सर्वकर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन व मिठाई वाटप करून बँक ऑफ इंडियाचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी बँक ऑफ इंडियाचे शाखा अधिकारी श्री सुरेंद्र यादव साहेब यांचा व सर्व कर्मचाऱ्याचा पुष्पगुच्छ देऊन मराठा विकास फाउंडेशन चे अध्यक्ष ज्ञानेश्वर (राहुल) आढाव यांच्या हस्ते सत्कार केला








यावेळी बँकेचे कर्मचारी श्री. विशाल जाधव साहेब,सालेन साहेब, शीतल जाधव मॅडम, किशोर जोशी, रमेश साबळे, सागर येशी, संतोष तदोळे, टी.व्ही चव्हाण, एकनाथ पगारे, अजिंक्य लोट, राहुल चंदनशिव व मराठा विकास फाउंडेशन चे उपाध्यक्ष श्री संतोष पेकळे सचिव संतोष कुटे सदस्य शशिकांत दवंगे, शशिकांत गायकवाड, एकनाथ लामखडे, अनिल शिंदे, सचिन शेळके आनंद गोडसे राहुल दिघे राहुल गायकवाड इत्यादी उपस्थित होते. या वेळी सत्काराला उत्तर देतांनी श्री यादव साहेब म्हणाले कि,बँक ऑफ इंडियाची स्थापना १९०६ साली करण्यात आली. कोपरगाव शाखेमध्ये ग्राहकांना जवळ जवळ १५० कोटी पेक्षा जास्त ठेवी आणि कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच पीपीएफ ,अटल पेन्शन येजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना , प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व जन धन बचत खाते चा लाभ कोपरगाव शहरातील व ग्रामीण भागातील ग्राहकांनी घेतला आहे. यावेळी शाखा अधिकारी श्री सुरेंद्र यादव साहेब यांनी मराठा विकास फाउंडेशन चे आभार मानले .
+
