
कोपरगाव प्रतिनिधी:-
सद्या सुरू असलेल्या सार्वजनिक गणेश उत्सवा निमित्त गुरू शुक्राचार्य मंदिरात दर वर्षी प्रमाणे याही वर्षी आपण श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. दर वर्षी आपण हा गणेश उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करत असतो व त्या निमित्त गुरू भक्तांनसाठी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते यंदाही आपण भक्तांसाठी गणेश पूजन , गणेश वंदना व अथर्वशीर्ष पठनाचा उपक्रम हाती घेतला होता . या निमित्त गणेश पूजनाचे महत्व , गणेश पूजन कसे करावे व अथर्वशीर्ष पठण त्याचे महत्व व फायदे भक्तांना समजाऊन सांगण्यात आले .मंदिराचे पुजारी श्री राजू गुरू उक्कडगावकर व जोशी गुरू यांनी हे व्यवस्थित सर्व भक्तांना समजाऊन सांगितले . सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले . या प्रसंगी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड , मंदिर प्रमुख श्री सचिन परदेशी, उप मंदिर प्रमुख श्री प्रसाद पऱ्हे , श्री आदिनाथ ढाकणे , श्री भागचंद रुईकर , श्री संजय वाडांगले, श्री बाळासाहेब ल कारे , मंदिर व्यवस्थापक राजाराम पावरा व भक्तगण उपस्थित होते .
