कोपरगाव येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा:- रहाणे सर…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव नगरपालिका शिक्षण मंडळात नुकताच एम. के. आढाव विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.देशभर ५ सप्टेंबर रोजी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. शिक्षक दिनानिमित्त कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी मा. श्री शांताराम गोसावी यांचे अध्यक्षतेखालीशिक्षक दिनाचा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रशांत शिंदे यांनी केले. डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांचे शुभ हस्ते पूजन करण्यात आले. कैलास साळगट व अर्चना बोराडे या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात मुख्यधिकारी यांनी नगरपालिका शिक्षकांच्या कामाचे मनोमन कौतुक केले. शहरी भागातील शैक्षणिक व सामाजिक अडचणींचा बाऊ न करता सकारात्मक दृष्टीने कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. शाळांच्या ज्या समस्या असतील त्या सोडविण्यासाठी नगरपालिका सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. यावेळी कोपरगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीम. शबाना शेख यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करून शैक्षणिक कार्याचे कौतुक करून शाबासकीची शब्दसुमने वाहिली. याप्रसंगी सर्व शिक्षकांना नगरपालिका शाळा नं.५ चे शिक्षक श्री सुनिल रहाणे यांनी दिलेली ५० वाचनीय पुस्तके देऊन मुख्याधिकारी व मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आली. यावर्षी राज्य पुरस्कार प्राप्त सौ. सविता साळुंखे, श्री विलास माळी व श्री अर्जुन शिरसाट यांचाही गौरव करण्यात आला. श्री विलास माळी यांचेतर्फे पेन देण्यात आले. याप्रसंगी नगरपालिका शिक्षण मंडळाचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व एम. के. आढाव विद्यालयाचे शिक्षक, आय. डी. बी आय. बँकेचे मॅनेजर व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. भावना खैरनार यांनी केले. आभार श्री माणिक कदम यांनी मानले.कार्यक्रममाचे यशश्वीतेकरिता कोपरगाव शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ लिपिक अमित पराई,मुख्याध्यापक वानखेडे सर, शेजवळ सर,अरुण पगारे, विलास माळी, अमोल कडू, संतोष जाधव,सनी जाधव, मुब्बाशीर खान,सनी गायकर,गोपाळ कोळी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *