श्री.चक्रधर स्वामी अवतारदिनाचे सोमवारी कोपरगांवात आयोजन…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
अखिल भारतीय महानुभाव परिषद अंतर्गत कोपरगांव तालुका महानुभाव समितीच्यावतीने सोमवार दि. २९ ऑगस्ट २०२२ रोजी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी अवतारदिन महोत्सवाचे कोपरगांव येथील कलश मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कोपरगांव तालुका महानुभाव समितीने दिली.
या महोत्सवात पहाटे ५ वाजता श्रीमूर्तीस अभिषेक, सकाळी ७ वाजता श्री चक्रधर स्वामी पारायण, सकाळी ९ वाजता ध्वजारोहण, त्यानंतर धर्मसभा, दुपारी १२ वाजता महाआरती व दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद असे कार्यक्रमाचे स्वरुप आहे. तसेच महोत्सवाच्यानिमित्ताने ज्येष्ठ आचार्यगणांसह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या महोत्सवासाठी सर्व भाविकांनी उपस्थित राहून ज्ञानश्रवणाचा, संत दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कोपरगांव तालुका महानुभाव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *