
कोपरगाव प्रतिनिधी:-
महापुरुषांच्या विचारांवर वैचारिक चळवळ उभी करायची असेल तर पुस्तकांची आवश्यकता आहे असे मत सेवा निवृत्त प्राध्यापिका श्रीमती नागरे मॅडम यांनी व्यक्त केले
रयत शिक्षण संस्थेत विविध उच्च महाविद्यालयात राज्यशास्त्र विषय शिकवणाऱ्या सेवा निवृत्त प्राध्यापिका श्रीमती नागरे यांनी त्यांच्या सेवा कारकिर्दीत घेतलेली शेकडो ग्रंथ त्यांचे वडील जेष्ठ स्वातंत्र सैनिक कॉ रामभाऊ नागरे यांच्या स्मरणार्थ लोक स्वराज्य आंदोलन या सामाजिक संघटनेस भेट दिली असून त्या निमित्ताने त्यांचा कृतज्ञता सोहळा व आभार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बागुल यांनी केले यावेळी विद्रोही कवी अकबर शेख, स्वच्छता दूत सुशांत घोडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले

या वेळी बोलताना प्रा श्रीमती बेबी नागरे म्हणाल्या की पुस्तकाच्या माध्यमा तून सक्षम व सुदृढ विचारांचा कार्यकर्ता उभा राहतो आणि या कार्यकर्त्याच्या माध्यमातून सक्षम चळवळ उभी राहावी
प्रा नागरे यांनी त्यांच्या सेवा काळातील शेकडो पुस्तके या वेळी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांना भेट दिली या वेळी बोलताना अँड.पोळ म्हणाले की विविध विषयांची पुस्तके भेट मिळाली असून या द्वारे सामाजिक परिवर्तनच्या
लढ्यात लढण्या साठी बळ मिळेल असा आशावाद व्यक्त केला
या वेळी माजी नगर सेवक सोमनाथ म्हस्के,सुजल चंदन शिव,शंकर बिऱ्हाडे किसान संघटनेच्या वैशाली नागरे वास्तुतज्ञ बाळासाहेब नागरे
वैशाली बाळासाहेब नागरे भाजपा (किसान महिला मोर्चा प्रदेश सरचीटनीस )
गायत्री दिवे
युवी नागरे (तु जीवाला गुंतवावे चाईल्ड आर्टिस्ट) आदी उपस्थित होते
