कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- दिव्यांग व्यक्तींना सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्राची आवश्यकता असते.हे प्रमाणपत्र मिळविणे सुलभ व्हावे यासाठी दिव्यांग बांधवांना आ. आशुतोष काळे यानी मागील दोन वर्षापासून अहमदनगर येथे जाण्यासाठी कोपरगाव येथून वाहन सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठीची दिव्यांगांची ससेहोलपट थांबली आहे.
दिव्यांग व्यक्ती दिव्यांग प्रमाणपत्रासाठी रांगेत तासन तास ताटकळत उभ्या असतात. त्यांना होणाऱ्या त्रासाची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील दिव्यांग बांधवांना अहमदनगर येथे येण्या-जाण्यासाठी मोफत वाहन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.त्यामुळे आजवर असंख्य दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत आहे. त्यामुळे अनेक दिव्यांगांना दिलासा मिळाला आहे. मागील आठवड्यात देखील अहमदनगर येथे गेलेल्या दिव्यांग बांधवांचे दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त झाले असून त्या प्रमाणपत्रांचे वितरण नुकतेच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आ. अशुतोप काळे म्हणाले की, दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग पत्र आवश्यक आहे. या प्रमाणपत्राशिवाय कोणत्याही योजनांचा लाभ मिळू शकत नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक लाभ घेता येत नाही. मतदार संघातील दिव्यांग व्यक्ती शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. मतदार संघातील एकही दिव्यांग शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये सर्वच दिव्यांगाना दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देवून त्यांचे जीवन सुखकर करण्याचा मानस असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, गोपीनाथ रहाणे, किरण होन, विलास चव्हाण, योगेश गंगवाल आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित होते.

फोटो ओळ:- दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्राचे वितरण प्रसंगी आ. आशुतोष काळे.
