

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील नगर-मनमाड हायवे लगत असणाऱ्या श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना येण्या-जाण्यासाठी मोफत रिक्षासेवा चालू केली आहे. पुणतांबा फाट्यापासून जवळपास ३ किमी अंतरावर असणाऱ्या एस जे एस हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची तारांबळ होऊ नये म्हणून
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष चांगदेव कातकडे व जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रसाद कातकडे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत मोफत रिक्षासेवा चालू केली आहे. ही सेवा सकाळी ८ वाजेपासून ते संध्याकाळी ८ पर्यंत चालू असते.या हॉस्पिटलच्या प्रशासनाने हा महत्वपुर्ण निर्णय घेतल्यान आता कोणत्याही रुग्णाला व भेटण्यासाठी येणाऱ्या माणसांना आता जाण्या येण्यासाठी सुरक्षित व्यवस्था सुरू केली आहे. हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी आता रुग्णांना कोणताही अडथळा होत नाही.रुग्ण जर बसमधून पुणतांबा फाट्याजवळ उतरला असाल व एस जे एस हॉस्पिटलमध्ये यायचे आहे व कोणतीही आपल्याकडे गाडीची व्यवस्था नाहीये तर मग लगेच ९८९०१९५८८२ किंवा ९६२३८३९००० या नंबर संपर्क करावा अशी माहिती श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलच्या प्रशासनाने दिली आहे.
