मराठी पत्रकार परिषद देखील डिजिटल मिडिया परिषद या नावानं डिजिटल मधील पत्रकारांसाठी स्वतंत्र व्यासपीठ लवकरच उपलब्ध:- एस.एम. देशमुख…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
सध्याचं युग डिजिटल मिडियाचं .. Print मिडिया असो वा इलेक्ट्रॉनिक मिडिया त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटस् आहेत..यावरून या नव्या माध्यमाचं महत्व अधोरेखीत होतं.. चॅनल्स आणि दैनिकां शिवाय व्यक्तीगत पातळीवर देखील अनेक युट्यूब चॅनल्स आणि पोर्टल राज्यात सुरू आहेत.. त्यांची संख्या 5000 पर्यत असावी असा अंदाज आहे. त्यामुळं डिजिटल मिडिया हेच भविष्यातील प्रभावी माध्यम असणार हे उघडंय.. काळाची गरज लक्षात घेऊन मराठी पत्रकार परिषद देखील डिजिटल मिडिया परिषद या नावानं डिजिटल मधील पत्रकारांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे..
डिजिटल मिडिया परिषदेची राज्य कार्यकारिणी लवकरच जाहीर केली जाईल.. जिल्हा शाखा देखील स्थापना करायला सुरूवात झाली आहे.. काल बीड जिल्हा डिजिटल मिडिया परिषदेची रितसर स्थापना करण्यात आली.. वास्तवचे संपादक जितेंद्र शिरसाट यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.. अन्य जिल्ह्यात देखील डिजिटल मिडिया परिषदेच्या शाखा सुरू करण्यात येत आहेत.. नव्या व्यवस्थेत काम करू इच्छिणाऱ्यांनी अनिल वाघमारे ( +91 98 22 548696) संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे..
बीडचे नूतन जिल्हा अध्यक्ष जितेंद्र शिरसाट यांचं मनापासून अभिनंदन..
एस.एम देशमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *