

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव जुने गावठाण,सराफ बाजार येथील श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थान प्रसिद्ध आहे.या देवस्थानचे वतीने श्रावण महिना निमित्ताने भजनसंध्या आयोजन करण्यात आले होते.
या भजन संध्येत ज्येष्ठ गायक व संगीतकार आनंदराव (अण्णा) आढाव, तबला वादक विकास किर्लोस्कर,तुलसीदास बागुल, सोपानराव डुबे, सुनील पोरे,ऋषिकेश पोरे,अनिल भावसार,सचिन माळवे,शाम जंगम,सौ.रेवती किर्लोस्कर,श्रीम.कविता साळुंके,अजय आहेर आणि सहकारी यांनी गणेश वंदना,शिवस्तुती,गजर, भैरवी यासह विविध पारंपरिक भजने गायन केले.शेवटी आरती घेण्यात आली.शास्रीय पध्दतीने पारंपरिक भजन गायन आणि त्यास मिळालेली हार्मोनियम,तबला आणि टाळ या वाद्यांची साथ याने भजन संध्येला रंगत आली होती.


सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने ज्येष्ठ गायक आणि संगीतकार आनंदराव आढाव यांचा मानाची टोपी,ऊपरणे,हार आणि श्रीफळ प्रसाद देवून सन्मान करण्यात आला.तसेच उपस्थित गायक व संगीतकार यांनाही श्रीफळ प्रसाद देवून सन्मान करण्यात आला. प्रमुख सौ.संगिता महेंद्र पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके,व्यवस्थापक जयंत विसपुते, नारायण अग्रवाल, महावीर शिंगी,मनोज शिंदे,मनोज कपोते,पुजारी नंदू शेंडे यांचे सह सोमेश्वर महादेव देवस्थानचे भक्त उपस्थित होते.
शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या श्रीमंत महामहीम पवार सरकार संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांविषयी ज्येष्ठ गायक व संगीतकार आनंदराव (अण्णा) आढाव व सहकारी यांनी समाधान व्यक्त करुन जिर्णोद्धार व सार्वजनिक कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
