ब्राह्यण सभा.कोपरगांवच्या वतीने इको फ्रेंडली शाडु माती गणेश मुर्ती कार्यशाळेचे आयोजन…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
ब्राह्यण सभा.कोपरगांवच्या विदयमाने पर्यावरण पुरक इको फ्रेंडली शाडु माती चे गणेश मुर्ती तयार करण्याची कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये कोपरगांवातुन विविध शाळेतील ५८ विद्यार्थी व व्यक्तींनी सहभाग घेतला. या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ब्राह्यण सभेचे अध्यक्ष श्री.मकरंद को-हाळकर यांनी विदयार्थींना मार्गदर्शन केले त्या प्रसंगी ते म्हणाले की गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर इको फ्रेंडली शाडु माती गणेश मुर्ती तयार करणे पर्यावरण पुरक आहे. कारण त्यामुळे पर्यावरणाचा -हास थांबतो. त्यामुळे कार्यशाळेचे आयोजन सातत्याने होणे आवश्यक आहे.
या कार्यशाळेला श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचे कला शिक्षक श्री.अतुल कोताडे व लायन्स मुक बधिर विदयालयाचे कला शिक्षक श्री.रविंद्र कांबळे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी यावेळी चांगल्या गणेश मुर्ती तयार करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी सर्व सहभागी प्रशिक्षणार्थीना प्रशस्तीपत्रके देण्यात आली.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी ब्राह्यण सभेचे सहसचिव व प्रकल्प प्रमुख संदीप देशपांडे,युवा आघाडीचे चि.अथर्व चिकटे , कु.अबोली जोशी,कु. प्राजक्ता जोशी , कु.आर्या महाजन, चि.सोहम को-हाळकर आदीनी विशेष परिश्रम घेतले. ब्राह्मण सभेचे उपाध्यक्ष श्री.राजेंद्र जवाद,खजिनदार जयेश बडवे,सह खजिनदार योगेश कुलकर्णी,सदस्य श्री. संजीव देशपांडे,श्री.वसंतराव ठोंबरे,श्री.मिलिंद धारणगांवकर आदी पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *