
कोपरगाव प्रतिनिधी:-
(देवळाली प्रवरा):-
प्रहार कामगार संघटनेच्या वतीने देवळाली प्रवरा येथे असंघटित बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाच्या कामगार मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारे मध्यान भोजन कार्यक्रमाचा शुभारंभ प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांचे हस्ते करण्यात आला.
प्रसंगी प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे कामगार संघटना प्रमुख बाळासाहेब कराळे, प्रहार देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष विजय कुमावत, प्रहार राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष शरद वाळुंज, प्रहार देवळाली प्रवरा शहर उपाध्यक्ष शिवाजी मुसमाडे, प्रहार राहुरी फॅक्टरी शहर उपाध्यक्ष गणेश भालके, प्रहार कामगार संघटनेचे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष किरण पंडित, केंद्र शासनाचा जलनायक पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे, दिगंबर तावरे, विजया घुले, आशा वरघुडे, सुशीला धाकतोडे, जया सरोदे, नाना संसारे, जालिंदर दुशिंग, दीपक संसारे, प्रदीप चव्हाण, अशोक चव्हाण, राजू दळवी यांच्यासह नोंदणीकृत लाभार्थी व असंघटित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसंगी बोलताना आप्पासाहेब ढूस यांनी सांगितले की, श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ क्षेत्राचे कामगार संघटना प्रमुख बाळासाहेब कराळे यांच्या पथक प्रयत्नामुळे देवळाली प्रवरा शहरामध्ये मध्यान भोजन योजना सुरू झाली असून अहमदनगरचे सहाय्यक कामगार उप आयुक्त माननीय कावले साहेब यांनी आमचे विनंतीस मान देऊन महाराष्ट्र शासनाच्या मध्यान भोजन योजना देवळाली प्रवरा शहरासाठी तात्काळ सुरू करून असंघटित बांधकाम कामगारांची जेवणासाठी होणारी गैरसोय दूर केल्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये असलेल्या सर्व असंघटित बांधकाम कामगारांनी प्रहारच्या कामगार संघटनेमध्ये सामील होण्याचे आवाहन आप्पासाहेब ढूस यांनी याप्रसंगी केले पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चुभाऊ कडू यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांचे सहकार्याने महाराष्ट्र शासनाची मध्यान भोजन योजना श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात सुरू करण्याचा आमचा मानस आहे. त्याचबरोबर कामगारांसाठी असलेल्या शासनाच्या जास्तीत जास्त योजना कामगारांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रहार कामगार संघटना करणार आहे.
