

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी ( शिर्डी )संजय जी सातव साहेब यांच्या हस्ते व कोपरगाव चे तहसीलदार विजय जी बोरुडे साहेब , पंचायत समितीचे बिडिओ सूर्यवंशी साहेब , कोपरगाव चे पोलीस निरीक्षक वासुदेव जी दिसले साहेब यांच्या उपस्थितीत , ७५ व्या स्वतंत्र दिनानिमित्य कोपरगाव पोलीस स्टेशन येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव गौरव पोलीस मित्राचा या अंतर्गत तौसिफ शेख यांना पोलीस मित्र म्हणून सन्मान करण्यात आला आहे.स्वांतत्र्यांचा अमृत महोत्सव निमित्ताने तौसिफ शेख यांचा सत्कार करुन सन्मानपत्र,शाल, पुष्पगुच्छ. देवुन सन्मान करण्यात आला आहे.तौसिफ शेख हे गेल्या १२ वर्षापासून कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात वार्ड बाँय म्हणुन काम करत आहे.या ठिकाणी त्यांनी गोर गरिबांना नेहमी मदत करत असतात.रुग्ण असो रुग्णांचे नातेवाईक असो,स्टाफ असो अशा सर्वांशी नम्रतेने आदराने ते बोलतात. अंत्यत शांत स्वभाव,आणि रूग्णांना नेहमी मदत,ते करत असतात,सरकारी दवाखाना असल्याने पोलिस स्टेशनचा येथे संपर्क हा असतो.भांडणे हाणामार्या झाल्यावर आरोपी,फिर्यादी यांना उपचारासाठी प्रथम शासकीय रूग्णालयात यावे लागते अशा प्रसंगी पोलिसांना देखील सहकार्य तौसिफ शेख करत असतात.त्यांच्या या कार्याची दखल पोलिस निरिक्षक वासुदेव देसले यांनी घेवुन त्यांचा पोलिस मित्र म्हणुन सन्मान केला आहे .
