कोपरगांव प्रतिनिधी:-
समाजाला संस्काराची दिशा देण्यांत संतांचा मोठा सहभाग असतो, संतांची वाणी उर्जेचे स्त्रोत आहे, हा स्त्रोत सातत्याने खरा होण्यासाठी परमेश्वर संताकरीता अवतार घेत असतात असे प्रतिपादन हभप माउली महाराज संगमनेरकर यांनी केले. ब्रम्हदशा व आत्मदशेबददलही त्यांनी माहिती दिली.
तालुक्यातील श्रीक्षेत्र शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील हनुमान मंदिरात सालाबादप्रमाणे याही वर्षी संजीवनी सांस्कृतिक मंडळाच्यावतींने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यांत आले होते त्याची सांगता काल्याचे किर्तनाने शनिवारी झाली त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे म्हणाले की, संपुर्ण जगतात संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या पायावर येणारी पुढची पिढी अनुभवातुन मोठी होत असते. हभप माउली महाराज संगमनेरकर यांच्या किर्तनाची वाणी ही सरलाबेटाचे महंत नारायणगिरी महाराज यांच्यासारखीच असल्यांने त्यांच्या तोडुन काल्याचे किर्तन ऐकतांना जे ज्ञानदान प्राप्त होते त्याला तोड नाही. ज्ञानेश्वरी पारायण सोहळयासाठी बसलेल्या पारायणार्थीमुळेच आपल्याला काल्याचा महाप्रसाद मिळतो. त्यातुन मिळालेली शिदोरी वर्षानुवर्षे अशीच अखंड टिकत राहो असेही ते म्हणाले. उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक त्रंबकराव सरोदे, कामगार नेते मनोहर शिंदे, वेणुनाथ बोळीज, कार्यकारी संचालक बाजीराव जी सुतार, हभप भानुदास महाराज रोहोम, हभप संगीताताई चव्हाण, आत्माराम नवले, सागर दिवटे, बाळासाहेब नवले, बाळासाहेब जाधव, बगाटे, वक्ते, कमलबाई रावजी कदम यांच्यासह, सर्व खाते प्रमुख उपखातेप्रमुख, संजीवनी उद्योग समुहातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते, शिंगणापुर, बोलकी, येसगांव, टाकळी, नाटेगांव, आपेगांव, कासली, तिळवणी, सावळगांव, पढेगांव, शिरसगांव, उक्कडगांव, दहेगांव आदि पंचकोशीतील भजनी मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते. पारायणाचे वाचन हभप शिंदे महाराज यांनी केले. ज्ञानेश्वरी पारायण सोहळा यशस्वी करण्यासाठी अॅडमिनीस्ट्रेटीव्ह मॅनेजर प्रकाश डुंबरे, सहायक लेखापाल प्रविण टेमगर, रंगनाथ लोंढे, संरक्षण अधिकारी रमेश डांगे आदिंनी परिश्रम घेतले.

फोटोओळी:-कोपरगांव
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील हनुमान मंदिरातील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाची सांगता हभप माउली महाराज संगमनेरकर, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आली.
