संजीवनीच्या २३ अभियंत्यांची डायनॅपॅक, इपिटोम, कनेक्टवेल, सीअर्स व विनजीत मध्ये नोकरीसाठी निवड:- श्री.अमितदादा कोल्हे…

Uncategorized

                                                 ग्रामिण विध्यार्थी बनताहेत वयाच्या २२ व्या वर्षी  कुटूंबाचा आधार...

कोपरगांव प्रतिनिधी:-
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातुन उद्योगाभिमुख नवोदित अभियंते तयार होत असल्याने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने महाविद्यालयातील विविध अभियांत्रिकी शाखांच्या अंतिम वर्षातील नवोदित अभियंत्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवुन देण्यात आघाडी घेतली आहे. डायनॅपॅक, इपिटोम, कनेक्टवेल, सीअर्स व विनजीत या कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत घेतलेल्या मुलाखतींचे निकाल जाहिर केले असुन यात २३ नवोदित अभियंत्यांची रू ६ लाखापर्यंत वार्षिक पॅकेज देवुकरून नोकरीसाठी निवड केली आहे. संजीवनी अभियांत्रिकी घेत असलेल्या प्रयत्नांमुळे ग्रामिण भागातील नवोदित अभियंते त्यांच्या वयाच्या २२ व्या वर्षी कुटूंबाचा आधार बनत आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की डायनॅपॅक इंडस्ट्रीज या साॅफ्टवेअर इकंपनीने निकिता विनोद वाघमारे, सुमित श्रावण देहरकर, श्वेता शेखर चौधरी व कल्पेश रावसाहेब सरोदे यांची निवड केली आहे. इपिटोम काम्पोनंटस् या विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांना पीसीबी पुरविणाऱ्या कंपनीने अमृता दत्तात्रय बडाख, राहुल मारूती दराडे, लोकेंद्र ओमप्रकाश जोशी , विनय विनोद काळणी, वैभव प्रदिप नळे व अपुर्वा श्रीराम फडे यांची निवड केली आहे. प्लास्टिक इंजेक्शन न मोल्डींग, काॅम्प्रेशन मोल्डींग, शीट मेेटल प्रोसेसिंग व टूल डीझाईन क्षेत्रात कार्यरत असलेल्या कनेक्टवेल या कंपनीने अनिल दादासाहेब कारंडे, निकिता दिनेश निमसे, सागर बाजीराव वक्ते व कुनाल विठोबा वाटपाडे यांची निवड केली आहे. सीअर्स या क्लाऊड, आर्टिफि शियल इंटिलिजन्स, मशिन लर्निंग, इत्यादी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपनीने शुभम सोमनाथ कुलथे, वैष्णवी रविंद्र उंडे व शुभम बाळासाहेब कांबळे यांची निवड केली आहे. आयओटी सोल्युशन्स, आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्षेत्रात कार्यरत असलेल्या विंजीत टेक्नाॅलाॅजिज कंपनीने राजश्री फकिरराव बोरणारे,मंगेश तुळशीराम गीते, इशान कुमार सेठी, स्वालिया शबिर शेख, पुणम दिलीप सांगळे व हिमानी गणेश त्रिवेदी यांची निवड केली आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले नवोदित अभियंते, त्यांचे पालक तसेच इंजिनिअरींग काॅलेजचे डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डीपार्टमेंटची सर्व टीम व विभाग प्रमुखांचे अभिनंदन केले आहे.
……
विध्यार्थ्यांच्या प्रतिक्रीया
‘मी श्रीरामपुर तालुक्यातील मातापुर येथिल शेतकऱ्याची मुलगी आहे. आमच्याकडून अद्ययावत तंत्रज्ञानासंदर्भात ऑनलाईन कोर्सेस करून घेण्यासाठी काॅलेज नेहमी आग्रही असायचे. त्या ज्ञानाचा उपयोग मला कंपनीची मुलाखत देताना झाला. कॅम्पस प्लेसमेंटसाठी येणाऱ्या कंपनीनुसार ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डीपार्टमेंट भरपुर तयारी करून घ्यायचे. त्यामुळेच माझी सीअर्स कंपनीने क्लाऊड इंजिनिअर म्हणुन वार्षिक पॅकेज रू ६ लाखांवर निवड केली. संजीवनमुळेच माझे व आई वडीलांचे स्वप्न पुर्ण झाले.’- वैष्णवी उंडे.
…..
‘मी मनमाड येथिल रहिवासी असुन माझे आई वडीलांनी छोटेसे किराणा दुकान चालवुन माझे शिक्षण पुर्ण केले. मला नोकरी मिळावी, अशी दोघांचीही प्रबळ इच्छा होती. संजीवनी मध्ये असताना परीस्थिती कशी हाताळायची, कशासाठी काय केले पाहीजे, हे आपोआपच शिकत गेलो. अभ्यासाबरोबरच माझ्यातील इतरही कौशल्ये विकसीत झाली. संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज मधिल शिक्षकांनी शिकविलेल्या ज्ञानाच्या जोरावर आणि त्यांनी मुलाखतीची तयारी करून घेतल्यामुळे माझी डायनॅपॅक कंपनीने वार्षिक पॅकेज रू ५. ५ लाखांवर निवड केली. माझ्या आई वडीलांचे स्वप्न संजीवनीमुळेच पुर्ण झाले.’- कल्पेश सरोदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *