
कोपरगाव प्रतिनिधी:-
संगमनेर येथील जि.प.प्रा.शाळेचे मा.मुख्याध्यापक व आधार फाऊंडेशनचे शिलेदार मा.श्री विठ्ठल दगडू कडूसकर, सर यांच्या “सेवानिवृत्त सेवापुर्ती गौरव समारंभ” अमृता लॉन्स, संगमनेर जि.अहमदनगर येथे करण्यात आला. या समारंभास महाराष्ट्र राज्य नाभिक एकता महासंघाचे जिल्हाध्यक्ष साईभक्त श्री मनोजभाऊ वाघ यांच्या हस्ते श्री विठ्ठल कडूसकर सरांना तसेच नाभिक महासंघ संपूर्ण परिवारातर्फे शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास ह.भ.प.श्रीकांत बिडवे सर, आधारचे फाऊंडेशनचे श्री सोमनाथजी मदने, नाभिक एकता महासंघाचे प्रवक्ते श्री किरणभाऊ मदने, राहाता तालुका अध्यक्ष श्री अशोकभाऊ कोरडे, राहूरी तालुका अध्यक्ष पत्रकार श्री अनिलभाऊ वाकचौरे, राहाता तालुका कार्याध्यक्ष श्री माऊलीभाऊ गायकवाड, मार्गदर्शक श्री सुभाषदादा बोर्डे, सामाजिक कार्यकर्ते श्री ज्ञानेश्वरजी दळवी, श्री लक्ष्मणभाऊ कोरडे, श्री बाळासाहेब अनार्थे, श्री रुपेशभाऊ अनार्थे, श्री कचरुदादा भालेकर, श्री जाधव सर, श्री संजयजी बोराडे, श्री रावताळे सर, श्री सतिषभाऊ जाधव, चि.ओंकारजी बिडवे, आंधळे सर, श्री रामदास कासार सर, श्री रमेशजी डोंगरे सर व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*या कौतुक सोहळ्यासाठी तालुक्यातील व जिल्ह्यातील प्रमुख पाहुणे, अतिथी, प्राथ.व माध्य.शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, आधार फाऊंडेशनचे सर्व टिम, मित्र परिवार, समाजातील विविध मान्यवर तसेच नाभिक समाजातील बंधू-भगिनी आवर्जून उपस्थित होते.
