

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव बस स्टॅन्ड आगारातील भांडार शाखेचे कडी कोयंडा तोडुन भांडार शोखतील 14,942 रु कि.ची मिटर वेल्डोंग कॉपर वायर वेल्डींग होल्डरसह कोणीतरी अज्ञात चोरटयाने दिनांक 17/04/2022 रोजी रात्री 02.30 ते 03.30 वा चे दरम्यान चोरुन नेले बाबत बाबु तुळशीराम खरात , वय 53 वर्षे , धंदा नोकरी , रा . सोनारवस्ती , धारणगाव रोड , कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरटयाविरुध्द फिर्याद दिल्याने कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गु रजि नंबर 90/2022 भादवि कलम 457,380 प्रमाणे दिनांक 17/04/2022 रोजी 14/28 वा गुन्हा दाखल आहे . सदरचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस निरीक्षक , वासुदेव देसले यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , अस्लम उमर कुरेशी रा . सुभाषनगर कोपरगाव याने सदरचा गुन्हा केला असल्याची माहीती मिळाल्याने . मा . वरिष्ठांचे मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी पो ना / अर्जुन दारकुंडे , पो . ना / 2173 बी.एस. कोरेकर , पो कॉ / राम खारतोडे , पो कॉ / 2563 जी . व्ही . काकडे पो कॉ / 414 व्ही.एल.मासाळ अशांचे एक पथक तयार करुन सदर आरोपी हा कोपरगाव शहरामध्ये येताच मिळालेल्या माहीती प्रमाणे आरोपीतांचा शोध घेतला असता , आरोपी अस्लम उमर कुरेशी वय 26 वर्षे रा . सुभाषनगर कोपरगाव हा कोपरगाव शहरात मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन दिनांक 18/04/2022 रोजी त्यास सदर गुन्हयात अटक केली आहे . नमुद आरोपीस विश्वासात घेवून त्याचेकडेस गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता , सदर आरोपीने त्याचा साथीदार समाधान प्रविण पाटील याचे मदतीने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे . त्यावरुन सदर आरोपीचा साथीदार समाधान प्रविण पाटील वय 21 वर्षे रा . सुभाषनगर कोपरगाव याचा शोध घेवुन त्यास दिनांक 19/04/2022 रोजी सदर गुन्हयात अटक केली आहे . आरोपी 1 ) अस्लम उमर कुरेशी वय 26 वर्षे , रा . सुभाषनगर कोपरगाव , 2 ) समाधान प्रविण पाटील वय 21 वर्षे रा . सुभाषनगर कोपरगाव यांना सदर गुन्हयात अटक करुन त्याचा पोलीस कोठडी रिमांड घेवून त्यांना विश्वासात घेवुन त्यांचेकडेस गुन्हयातील गेले मालाबाबत विचारपुस केली असता आरोपीतांनी 14,000 / -रुकिची 21 किलो कॉपर वायर ( ताव्यांची तार ) काढुन दिल्याने ती पंचासमक्ष जप्त केली आहे . गुन्हयातील गेला माल हस्तगत केला आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक , वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो ना / अर्जुन दारकुंडे हे करीत आहेत . सदरची तपास कारवाई मा . श्री . संजय सातव सो . उपविभागीय पोलीस अधिकारी सो , शिर्डी विभाग शिर्डी यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. वासुदेव देसले , पो ना / अर्जुन दारकुंडे , पो ना / 2473 बी . एस . कोरेकर , पो कॉ / संभाजी शिंदे , पो कॉ / राम खारतोडे , पो कॉ / 2563 गणेश काकडे , पो कॉ / 414 व्ही.एस. मासाळ , पो कॉ / कांदळकर यांनी केलेली आहे .
