मुलाच्या साक्षीने राहुरीत होणार कोरोना एकल (विधवा) मातेचा पुनर्विवाह; देवळाली प्रवरा पॅटर्न ठरतोय राज्यासाठी आदर्श:- आप्पासाहेब ढुस…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी):-
मुलाच्या साक्षीने राहुरीत लवकरच दुसरा कोरोना एकल (विधवा) मातेचा पुनर्विवाह होत असून त्यासाठी देवळाली प्रवरा पॅटर्न राज्यासाठी आदर्श ठरला असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राहुरी तालुका अध्यक्ष तथा.. प्रहार चे श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी आमचे प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.
पुढे बोलताना ढुस म्हणाले की, जुन्या रूढी व परंपरांना झुगारून देत महाराष्ट्र राज्य कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ महिन्याचे बाळ असलेल्या कोरोना एकल (विधवा) महिलेचा देवळाली प्रवरा येथे विवाह लावून देणेत आम्हाला सर्वप्रथम यश आले. या ऐतिहासिक प्रसंगाची दखल संपूर्ण राज्याने घेतली, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालिताई चाकणकर, राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या तत्कालीन मंत्री यशोमती ताई ठाकूर यांनी थेट मला दूरध्वनी द्वारे संपर्क करून वधू वरा सह माझे व समितीचे सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.
महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या राहुरी तालुका कार्यकारीनिवर माझे खांद्याला खांदा लावून काम करीत असलेले सचिव प्रशांत कराळे, प्रसिद्धी प्रमुख शिवाजी घाडगे आदींसह जेंव्हा आम्ही राहुरी तालुक्यातील एकल भगिनींच्या समस्या जाणून घेनेसाठी त्यांची माहिती घेत होतो तेंव्हा राहुरी तालुक्यातील माहेर असलेल्या व सोनई मध्ये सासर असलेल्या जान्हवी ताई चे पती कोरोनाने दगावलेचे आम्हाला समजले, समितीचे सर्व सदस्य आम्ही त्यांना दुखवट्याच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जून २०२१ मध्ये सोनई येथे त्यांच्या सासरी दारावर भेटायला गेलो असता त्यांच्या १० वर्षे वय असलेल्या मुलाच्या भवितव्यासाठी आम्ही पुनर्विवाहाचा विषय काढला, तथापि त्यांनी लगेच नकार देत सद्या तरी तसे काही विचार नसल्याचे सांगितले होते, परंतु जेंव्हा देवळाली प्रवरा येथे नऊ महिन्याचे बाळ असलेल्या एकल महिलेचा पुनर्विवाह झाल्याचे व त्या लग्नाचे राज्यात सर्वत्र कौतुक झाल्याचे त्यांना समजले तेंव्हा त्यांच्या मनावरील सामाजिक दडपण काहीसे कमी झाले व त्यांनी दुसऱ्या भेटीत पुनर्विवाह बद्दल सकारात्मकता दाखविली.
सासर माहेर दोन्ही बाजूला चर्चा झाली आणि अखेर हो ना करता त्यांच्याच दिरासोबत हा विवाह जुळून आणनेत समितीला यश आले.
लवकरच जानव्हीताई त्यांच्या अकरा वर्षे वयाच्या मुलाच्या साक्षीने त्यांच्याच बिगर लग्नाच्या दिरा सोबत राहुरी येथे थाटामाटात विवाह करून दुसऱ्यांदा सुखाचा संसार उभा करीत आहेत. असे ढुस यांनी सांगितले.
जाणव्ही ताई सह त्यांच्या दिराने हे धाडसी पाऊल उचलून समाजासमोर एक आदर्श निर्माण केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी, अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, सचिव प्रशांत कराळे, प्रसिद्धी प्रमुख पत्रकार शिवाजी घाडगे आदींनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *