कोपरगाव शहर व ग्रामीण भागात अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीची ना.आशुतोष काळेंनी केली पाहणी तातडीने पंचनामे करण्याच्या तहसीलदारांना सूचना…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव शहरासह ग्रामीण भागात मागील दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांच्या घरात छोट्या मोठ्या व्यवसायिकांच्या देखील दुकानात पाणी शिरले तर शेतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिक,शेतकरी,व्यापारी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर नुकसानीची ना.आशुतोष काळे यांनी पाहणी केली असून तातडीने पंचनामे करण्याच्या तहसीलदार विजय बोरुडे व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना सूचना दिल्या आहेत.
मागील दोन दिवसापासून कोपरगाव शहरासह मतदार संघात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरून शेतातील उभ्या पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदार विजय बोरुडे यांना दिल्या आहेत.
यापूर्वी अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या नुकसानीची नुकसानग्रस्तांना मोठी नुकसान भरपाई मिळवून दिली आहे.त्याप्रमाणे झालेल्या नुकसानीची देखील जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.महसूल व कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे सविस्तर पंचनामे करून एकही नुकसानग्रस्त पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी जेणेकरून सर्वच नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यास अडचणी येणार नाही.त्यासाठी सर्वच पंचनामे अचूक करावे अशा सूचना ना.आशुतोष काळे यांनी महसूल व कृषी विभागाला दिल्या आहेत.पंचनामे करीत असताना नुकसानग्रस्तांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास कोपरगाव व कोळपे वाडी येथील जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन ना.आशुतोष काळे यांनी केले आहे.

फोटो ओळ – पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदार विजय बोरुडे यांना देताना ना.आशुतोष काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *