

कोपरगाव प्रतिनिधी:-क्रीडा व युवक संचनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय व क्रीडा परिषद सोलापूर आयोजित विभागीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत सोमैया विद्यामंदिर साकरवाडीच्या एकोणीस वर्षाखालील मुलींच्या संघाने गगन भरारी घेत या स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले आहे आणि सोमैय्या शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे हा संघ आता राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व करणार आहे चौदा वर्षा खालील मुलींच्या संघाने देखील उपविजेतेपद पटकाविले आहे तसेच एकोणीस वर्षा खालील मुलांच्या संघानेही तृतीय क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे सर्वच खेळाडू ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांच्या घरातील आहेत त्यांनी मिळविलेले हे यश अहमदनगर जिल्ह्यासाठी व पुणे विभागासाठी भूषणावह आहे ज्या खेळावर संपूर्ण देशात पुणेकरांचे वर्चस्व असताना साकरवाडी वारी सारख्या खेड्यातील मुलींनी मिळविलेले हे यश अतुलनीय आहे गेल्या बारा वर्षांपासून सोमैया विद्यामंदिर साकरवाडीचे खेळाडू सातत्याने स्पर्धा गाजवत आहेत जानेवारी महिन्यात देखील राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत मुलींनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांक पटकावला होता
संस्थेचे अध्यक्ष उद्योजक समीरजी सोमैय्या यांना या यशाचे श्रेय जाते कारण त्यांनी सर्वसामान्य मुलामुलींना खेळाची संधी उपलब्ध करून दिली तसेच गोदावरी बायो रिफायनरीजचे संचालक सुहासजी गोडगेसाहेब व व्यवस्थापनातील सर्व पदाधिकारी सोमैया स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रमुख एजाज सर व त्यांची पूर्ण टीम जिल्हा क्रीडाधिकारी दिलीपजी दिघे,विशाल गर्जे,मिलिंद कुलकर्णी यांनीही मुलामुलींना वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन केले आहे व सातत्याने करत आहेत. तसेच प्राचार्या सुनीता पारे, सर्व शिक्षक शिक्षिका यांचेही सहकार्य नेहमीच लाभते यशस्वी सर्व खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक संजय अमोलिकसर यांचे मार्गदर्शन सातत्याने लाभले


