कोपरगावचा संगणक अभियंता चि.समिरण जोशी अमेरिका येथे युटा विद्यापीठात १६ ऑगस्ट रोजी होणार संशोधनासाठी रवाना…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
संगणक अभियंता चि.समिरण जयंतराव जोशी अमेरिका येथे युटा प्रांतात साॅल्टलेक(सिटी) शहरातील युटा विद्यापिठात साडेपाच वर्षांचा परम संगणक शिक्षण आणि सेमी कंडक्टर यातील संशोधनासाठी रवाना होणार…

चि.समिरण जोशीच्या जिद्द आणि चिकाटीने मिळालेल्या यशाचे सर्वत्र कौतुक..‌.

सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे कडून सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव…
चि.समिरण जोशीच्या शालेय शिक्षण सेवा निकेतन येथे झाले आहे…तर महाविद्यालयीन शिक्षणात एस.एस.जी.एम.काॅलेज येथे सायन्सची पदवी शिक्षण घेतले आहे.पुढे त्याने संगणक अभियांत्रिकी शिक्षण पुणे विद्यार्थी गृह घेतले…त्यानंतर कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथे ए.एम.डी. कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम पहात होता…


माणवी जीवनात असामान्य क्रांती घडविणा-या संगणक युगात आपण पुढे जगाच्या पाठीवर संगणक क्षेत्रातील ज्ञान आणि संशोधनक्रीयेत सहभागी व्हावे असे समीरणला नोकरीत असतांनाच मनोमन वाटले आणि तेथून सुरु झालाय समिरणचा एक नवा प्रवास…अमेरिका येथे युटा प्रांतात साॅल्टलेक शहरातील युटा विद्यापिठात साडेपाच वर्षांचा परम संगणक,सेमी कंडक्टर (हे संगणक नासा/ईस्रो वापरतात) या विषयावर संशोधनासाठी त्याची निवड झाली आहे… युटा विद्यापिठाचे तज्ञ प्राध्यापक व समिती व्दारे गुणी विद्यार्थींची निवड करत असतात…ही प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आणि कठोर पडताळणी द्वारे केली जाते…ही निवड प्रक्रिया सुमारे तीन महिने चालते.. समीरणचे संगणकाविषयी ज्ञान आणि संशोधक चिकित्सा पाहून त्याला अमेरिकेतील तिन विद्यापिठाने प्रवेशासाठी मागणी केली होती..‌.त्याला अमेरिकेतील न्यूयॉर्क जवळील रटगर्स विद्यापीठ,शिकागो जवळील नाॅर्थवेस्टर्न विद्यापीठ आणि तिसरे युटा प्रांतात साॅल्टलेक शहरातील युटा विद्यापिठ यांचा समावेश होता.या तिनही विद्यापिठाने समीरणचा संपुर्ण शिक्षण आणि संशोधन खर्चाची तयारी दर्शवली…साडेपाच वर्षांचा समीरणचा खर्च सुमारे तीन कोटींच्या सुमारास आहे…
यात समीरणने युटा प्रांतात साॅल्टलेक शहरातील युटा विद्यापिठात अभ्यासक्रम पुर्ण करण्याची तयारी दर्शवली आहे…त्यांचे शिक्षण आणि संशोधन संपूर्ण खर्च मोफत होणार असून त्याला शिष्यवृत्ती मिळाली आहे…समीरणला सोबत २७०० डाॅलर (अंदाजे दोन लक्ष रुपये) दरमहा स्वतंत्र मिळणार आहे… येत्या १६ ऑगस्टला समीरण अमेरिकेला रवाना होत आहे…
चि.समीरण हा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी, प्रसिद्ध विधीज्ञ कै.आत्मारामदादा जोशी व श्रीमती पुष्पाताई जोशी यांचा नातू असून कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.जयंतजी जोशी व सूर्यतेज सल्लागार सदस्या ॲड.सौ.स्मीताताई जोशी यांचा मोठा मुलगा आहे… तसेच प्रगतशील शेतकरी व गोसेवक श्री.धनंजय जोशी व गृहिणी सौ.दिपश्रीताई धनंजय जोशी, श्रीनिवास ट्रेडर्सचे संचालक श्री.मकरंदजी जोशी व गृहिणी सौ.मितालीताई जोशी यांचा पुतण्या आहे.
संगणक अभियंता समिरण जोशी हा अमेरिकेत साडेपाच वर्षाचे शिक्षण आणि संशोधन पूर्ण करुन संशोधनाचा प्रबंध अमेरिकेतील युटा विद्यापिठात सादर करेल अन् सन्मानेने मिळालेली डाॅक्टरेट पदवी संपादन करुन संगणक विश्वाचा एक नवा आयाम जगासमोर आणेल तेव्हा आम्ही कोपरगांवकर अभिमानाने सांगू…”कोपरगावचा भुमी पुत्र हा…” संगणक अभियंता समिरणला भावी वाटचालीस सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे कडून सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करुन
शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *