दफनभूमी व स्मशानभूमीचा प्रश्न ना. आशुतोष काळेंनी सोडविला नागरिकांना त्रास होता कामा नये जलद सेवा द्या प्रशासनाला दिल्या सूचना…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील करंजी येथे आदिवासी स्मशानभूमीसाठी व मढी बु. तसेच राहाता तालुक्यातील चितळी येथे मुस्लीम समाजाच्या दफनभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे या समाजातील नागरिकांना अडचणी येत होत्या. त्या अडचणींची दखल घेवून ना. आशुतोष काळे यांनी या नागरिकांची अडचण कायमची सोडवून या नागरिकांना स्मशानभूमी व दफन भूमीसाठी जागा उलब्ध करून दिली आहे. त्या जागेचे शासन मंजुरी आदेश नुकतेच ना. आशुतोष काळे यांनी करंजी येथील आदिवासी बांधवांना व मढी बु. तसेच चितळी येथील मुस्लीम बांधवांना सुपूर्द केले आहे. त्याबद्दल नागरिकांनी ना. आशुतोष काळे यांचे आभार मानले.
तहसील कार्यालय कोपरगाव येथे सोमवार (दि.२५) रोजी ना. आशुतोष काळे यांनी महसूल विभागाची आढावा बैठक घेतली यावेळी हे शासन मंजुरी आदेश नागरिकांना देण्यात आले. यावेळी बैठकीत मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की, महसूल विभागाच्या बाबतीत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. नागरिकांना त्रास होणार नाही याची सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी दक्षता घेवून नागरिकांना जलद सेवा द्यावी. त्यांना चकरा मारण्यास लावू नका. अनेक नागरिकांना रेशन कार्ड संदर्भात अडचणी येत आहेत. त्याबाबत महसूल विभागाने नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात. त्याबाबत पुढील बैठकीत नागरिकांच्या तक्रारी येता कामा नये.नागरिकांच्या तक्रारी आल्यास अशा अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. शिवरस्ते, शेत पानंद रस्ते व विवादित रस्त्यांची प्रकरणे त्वरित मार्गी लावण्यात यावीत, विविध प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावा अशा सूचना देवून संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी अपंग योजना, श्रावणबाळ योजना व राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनांचा त्यानी आढावा घेतला.मागील काही दिवसांपासून धरणक्षेत्रात पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे येणाऱ्या काळात अतिवृष्टी होवून पूर परिस्थिती निर्माण झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाचा संभाव्य परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत याचा देखील आढावा घेतला. पुराच्या पाण्यामुळे किंवा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे अशा सूचना ना. आशुतोष काळे यांनी यावेळी महसूल विभागाला दिल्या.
यावेळी स्मशानभूमी व दफनभूमीचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे आदिवासी व मुस्लीम समाज बांधवांनी ना. आशुतोष काळे यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले. याप्रसंगी तहसीलदार विजय बोरुडे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरणारे, संचालक अनिल कदम, विष्णु शिंदे, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, माजी सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, सुधाकर होन, राहुल जगधने, माजी नगरसेवक मंदार पहाडे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, शैलेश साबळे, इम्तियाज अत्तार, नितीन शिंदे, अनिल दवंगे, अमित आगलावे, अशोक गायकवाड, करंजी एकलव्य संघटनेचे तालुका सचिव संभाजी आहेर, ज्ञानदेव आहेर, सुनील गायकवाड, अनिल गायकवाड, केशव पवार, राजु आहेर, वाल्मिक निकम, भरत जगताप,मढी बु. चे सरपंच प्रवीण निंबाळकर, निवृत्ती गवळी, अनिल गवळी, निसार सय्यद, आसिफ सय्यद, मगबुल सय्यद,भैय्या सय्यद, सादिक सय्यद, मस्तान सय्यद, शहाबुद्दीन सय्यद, चितळी येथील मौलाना सरताज काझी, मौलाना आमीन शेख, मौलाना शाहबाज मिफताई, दिपक वाघ, बाबासाहेब वाघ, नितीन वाकचौरे, रुपेश गायकवाड, तौफिक कुरेशी, मोसीन चौधरी, नुमान कुरेशी, फिरोज शेख, रसूल शेख, दादा शेख, समीर चौधरी, जावेद बागवान, ख्वाजा शेख, जावेद पठाण, शौकत शेख, सलिम शेख, हुसेन पठाण, जावेद सय्यद, सांडू सय्यद, आयुब शेख, महेबुब तांबोळी, अमजद शेख, सिकंदर पठाण, लियाकत शेख, गुलाब इनामदार आदी उपस्थित होते
.

फोटो ओळ:- आदिवासी व मुस्लीम बांधवांना स्मशानभूमी व दफन भूमीसाठी देण्यात आलेल्या जागेचे शासन मंजुरी आदेश देतांना ना. आशुतोष काळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *