

कोपरगाव प्रतिनिधी:-
नुकत्याच झालेल्या संस्कार भारती या संस्थेद्वारे अहिल्यानगर जिल्हास्तरीय
”सुगम संगीत गायन स्पर्धेत”
“शारदा संगीत विद्यालय”, कोपरगाव येथील 9 विद्यार्थ्यांची निवड झाली होती.
त्या पैकी पुढील स्पर्धकांना स्पर्धेत बक्षीस मिळाले.
संस्कृती रौंदाळे – तृतीय क्रमांक मिळाला. रू. 1000/- रोख बक्षीस, ट्रॉफी आणि सर्टिफिकेट मिळाले.
संस्कृती भाटे- उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. रू. 500/- रोख बक्षीस आणि सर्टिफिकेट मिळाले.
तसेच निवड झालेले इतर विद्यार्थी – अन्वी अमोल वाकचौरे, देवाशिष भाऊसाहेब बडे, शर्मिला सदाशिव धारणगावकर, जान्हवी अमोल वाणी, तन्वी राहुल जंगम, समृद्धी वाल्मीक रौंदाळे, साईक्षा किशोर शिंदे हे विद्यार्थी होते.
शारदा संगीत विद्यालयाच्या या सर्वच विद्यार्थ्यांनी आपापली गाणी अतिशय उत्कृष्ठ रीतीने सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.

या सर्व विदयार्थ्यांना विद्यालयाचे संचालक श्री. केतन कुलकर्णी आणि सौ. दीपाली कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
