संजीवनी अकॅडमीची सीबीएसई निकालात उत्तुंग भरारी:- डॉ. मनाली कोल्हे…

Uncategorized

इ. १० वीत साक्षी लोहकणे हिने ९७ टक्के व इ. १२ वीत सुयोग कोठारी याने ९६. ८० टक्के टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम…
कोपरगांव प्रतिनिधी:-
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी अकॅडमीच्या शैक्षणिक वर्ष २०२१- २२ मधिल इ. १० वी व इ. १२ वीच्या विध्यार्थ्यानी दिलेल्या सीबीएसई परीक्षांच्या निकालांमध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे. यात इ.१० वीच्या परीक्षेत साक्षी सुनिल लोहकणे हीने शेकडा ९७ टक्के गुण मिळवुन शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान पटकावुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन घडविले तर, इ. १२ वी मध्ये सुयोग मनिश कोठारी याने ९६- ८० टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम क्रमांक मिळविला. इ. १० वी व इ. १२ वी या दोनही वर्गांचे निकाल १०० टक्के लागले असुन संजीवनी अकॅडमीने नेहमीप्रमाणेच निकालात उत्तुंग भरारी कायम ठेवली आहे, अशी माहिती संजीवनी अकॅडमीच्या संचालिका डाॅ. मनाली अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात डाॅ. कोल्हे यांनी म्हटले आहे की इ. १० वीत गर्व राहुल रोहरा हा ९६- ६७ टक्के मिळवुन दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. प्रांजल मनोज गोळेचा हीने ९५. ६७ टक्के गुण मिळवुन शाळेत तिसरी आली. तर स्तुती मयुर पटेल व अन्वय रोहीत कसबे यांनी अनुक्रमे ९४ व ९३. ५० टक्के मिळवुन चौथ्या व पाचव्या गुणानुक्रमांकावर यश संपादन केले. साक्षीने संस्कृत मध्ये १०० पैकी १०० तर अन्वयने संस्कृत व गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवीले.
इ. १२ वी मध्ये सुयोग मनिश कोठारी याने ९६. ८० टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम क्रमांक मिळविला. भुमिका बाबासाहेब कदम ही ९२. ८० टक्के गुण मिळवुन दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. हीने बिझिनेस स्टडीज मध्ये १०० पैकी १०० गुण मिळविले. खुषी महेषकुमार वर्मा ही ८९. २० टक्के गुण मिळवुन तिसरी आली. तर ओम राजेंद्र नेवगे व मानवी नविन भार्गव यांनी अनुक्रमे ८७. ६० व ८७. २० टक्के गुण मिळवुन ४ था व ५ वा क्रमांक मिळविला.
इ. १० वी मध्ये १५ विध्यार्थ्यानी ९० टक्यांपेक्षा अधिक तर ४० विद्यार्थ्यांनी ८० ते ८९ टक्के गुण मिळवुन संजीवनी अकॅडमीच्या शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व डाॅ. मनानी कोल्हे यांनी सर्व गुणवंत विध्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे, तसेच प्राचार्या व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

फोटो:- इ. १० वीचे पहिल्या तीन टाॅपर्सचे फोटो देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *