कोपरगांव प्रतिनिधी:-
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याच्या सर्व कर्मचा-यासाठी मोफत कोरोना बुस्टर डोस देण्यांत आले त्या कॅम्पचे उदघाटन कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांच्या हस्ते करण्यांत आले.
श्री. बाजीराव सुतार म्हणाले की, युवानेते व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे नवनिर्वाचित अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी कोरोना महामारीत मतदार संघातील रूग्णाबरोबरच सभासद शेतक-यांची विशेष काळजी घेवुन त्यांच्यासाठी स्वतंत्र मोफत कोविड केअर सेंटर उभारले. कारखाना कर्मचारी वर्गाच्या आरोग्यासाठीही त्यांनी सातत्यांने कॅम्पचे आयोजन करून त्याद्वारे पुरेशा प्रमाणांत लसीच्या मात्रा उपलब्ध करून दिल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवसाचे औचित्य साधुन कारखान्याचे मार्गदर्शक बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे व कारखान्यांचे नवनिर्वाचित अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांचे संकल्पनेतुन कामगार, कर्मचारी, अधिकारी यांना कोरोना बुस्टर डोस मोफत देणेचे नियोजन कौतुकास्पद आहे तसेच कारखान्याचे कर्मचा-यांसह कुटुबियांची कोरोनापासून बचाव होणेकामी असे वेळोवेळी उपक्रम राबविल्यांने संजीवनी उद्योग समुह एक सुरक्षीत कुटूंब हाच त्या पाठीमागचा प्रमुख उददेश असुन त्या सर्वांचे प्रयत्न यामागे राहिलेले आहेत.
तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. विकास घोलप यांनी या कॅम्पसाठी सहकार्य केले. संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अनिकेत खोत व त्यांच्या सहका-यांनी तसेच शिंगणापुर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे डॉ. कृष्णा पवार, धनवटे सिस्टर यांनी कोरोना बुस्टर डोसचे काम चोखपणे पार पाडले.
याप्रसंगी चीफ इंजिनियर के. के. शाक्य, चीफ केमिस्ट विवेककुमार शुक्ला, एच. आर. मॅनेजर प्रदिप गुरव, केमिकल विभागाचे प्रमुख टी. व्ही. देवकर, वैद्यकिय अधिकारी डॉ. मनोज बत्रा यांच्यासह विविध खातेप्रमुख, उपखातेप्रमुख उपस्थित होते.


फोटोओळी:-कोपरगांव- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याच्या सर्व कर्मचा-यासाठी मोफत कोरोना बुस्टर डोस देण्यांत आले त्या कॅम्पचे उदघाटन कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांच्या हस्ते करण्यांत आले, यावेळी त्यांनी कामगारांना मार्गदर्शन केले.
