
कोपरगाव प्रतिनिधी:-
ध्वजारोहण कार्यक्रम निमंत्रण
जय हरीयोगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांचा १७५ वा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र कोकमठाण व पंचक्रोशी ता.कोपरगाव दिनांक 02 ऑगस्ट 2022 ते 9 ऑगस्ट 2022 या कालावधीत श्री क्षेत्र कोकमठाण या ठिकाणी संपन्न होणार आहे.
अखंड हरिनाम सप्ताह ध्वजारोहण कार्यक्रम श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने व सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते दिनांक २१ जुलै २०२२ वार गुरुवार रोजी सकाळी १0.०० वाजता सप्ताह मैदान या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तरी ध्वजारोहन कार्यक्रमासाठी आपण उपस्थित रहावे ही नम्र विनंती..
ठिकाण-सप्ताह स्थळ, जंगली महाराज आश्रम जवळ, शिर्डी-कोपरगाव रोड, कोकमठाण,ता. कोपरगाव, जिल्हा अहमदनगर.
हा मेसेज जास्तीत जास्त भाविकांपर्यंत पाठवावा.
