गोदावरी नदी किनारी माता- भगिनींना कपडे बदलण्यासाठी आडोसा करण्याची मागणी….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव नगरपालिकेने गोदावरी नदीच्या किनारी माता-भगिनींना किमान श्रावण महिन्या पुरते नदीवर स्नान झाल्यानंतर कपडे बदलण्यासाठी काहीतरी आडोसा करावा अशी मागणी गोदावरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देत केली आहे सदर निवेदनाची प्रत उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांनी स्वीकारली.


याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, शुक्रवार दि २९ जुलै पासून पवित्र असा श्रावण महिना सुरू होत असुन हिंदू धर्मांमध्ये या महिन्याला अनन्य साधारण महत्त्व असून या महिन्यात संपूर्ण जगभरातील विविध धार्मिक स्थळी व नदी किनारी अनेक प्रकारच्या पूजा पाठ मोठ्या जल्लोषात सुरू असतात.
दक्षिण गंगा म्हणून समजली जाणारी पवित्र गोदावरी नदी ही कोपरगाव शहरातून वाहत असून या नदी किनारी अनेक प्रकारची प्राचीन हिंदूधर्मीय मंदिरे असून राज्यभरातील भाविक श्रावण महिन्यात येथे दर्शनासाठी येत असतात आणि पवित्र गोदावरी नदीत स्नान करत असतात यात महिला भाविकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते परंतु या नदी किनारी महिला भाविकांना स्नानानंतर कपडे बद्दलण्यासाठी पुरेशी अशी आडोशाची जागा नसल्याने महिलांची मोठी कुचंबना होत असते त्या मुळे नगरपालिकेने किमान श्रावण महिन्यापुरते तरी तात्पुरत्या स्वरूपात का होईना महिलांना कपडे बदलण्यासाठी व्यवस्था करावी अन्यथा गोदामाई प्रतिष्ठान ला व्यवस्था करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी कोपरगाव नागरपलीकेकडे निवेदन देत केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *