कोपरगांव प्रतिनिधी:-
नुकत्याच झालेल्या शालांत परिक्षेत संजीवनी इंग्लिश मिडीयम, स्कूलच्या शंभर टक्के निकालाची परंपरा याही वर्षी कायम राहिली असे प्रतिपादन सौ. रेणुका विवेक कोल्हे यांनी केले, त्यांच्या हस्ते दहावी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करायांत आला.
प्रारंभी शाळेचे शैक्षणिक विभागाचे मुख्य हरिभाऊ नळे यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली. प्राचार्य बाळासाहेब जाधव प्रास्तविक करतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी या शाळेचे रोपटे लावले. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी शाळेच्या शैक्षणिक विकासात लक्ष दिले, जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी मुलांच्या शैक्षणिक बुद्धांक वाढीसाठी आवश्यक त्या सुविधा पुरवून दहावी परिक्षेतील मुला- मुलींना सातत्याने मार्गदर्शन केले.
सौ. रेणूका कोल्हे पुढे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील मुला-मुलींनी आपले शैक्षणिक ध्येय कायम ठेवावे व ते साध्य करण्यासाठी मन लावून अभ्यास करावा. संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलची दहावी निकालाची शंभर टक्के परंपरा कायम राहिली याचा अभिमान आहे. प्रत्येक क्रीडा स्पर्धेत या विद्यालयाच्या खेळाडूंची जिल्हा व राज्य स्तरावर नाव लौकिकास्पद कामगिरी असते, शैक्षणिक गुणवत्तेतही या विद्यार्थ्यांनी आपले नाव पुन्हा एकदा झळकवले आहे. शिक्षण हीच मोठी संपत्ती आहे, असेही त्या म्हणाल्या. विद्यालयांत दहावी परिक्षेत हिमांशू चंद्रशेखर बावीस्कर ९२.८० टक्के (प्रथम), उत्सवी संदिप देवकर ८८.६० टक्के (द्वितीय), मितल सतिष लोहकणे ८७.२० टक्के (तृतीय) क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यांत आला. यावर्षी ५७ मुले परिक्षेस बसले होते, त्यापैकी ३८ विद्यार्थी विशेष गुणवत्तेत तर १९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

फोटो ओळी:- कोपरगाव संजीवनी इंग्लिश मिडीयम, स्कूलच्या दहावी परीक्षI शंभर टक्के निकालाची परंपरा याही वर्षी कायम राहिली त्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा सौ. रेणुका विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
