वामनराव उगले सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी रंगनाथ उगले तर उपाध्यपदी धर्मा शिंदे बिनविरोध निवड…

Uncategorized

उगले सोसायटीची ६६ वर्षापासून बिनविरोध निवडीची परंपरा कायम…
कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील मुर्शतपुर येथील वामनराव उगले सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी रंगनाथ रामा उगले तर उपाध्यक्षपदी धर्मा मारुती शिंदे यांची नुकतीच निवड झाली. गेल्या ६६ वर्षापासुन या संस्थेचे संचालक मंडळ बिनविरोध निवडले जाते ती परंपरा कायम ठेवली आहे. या निवडीबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे भाजपचे प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिनंदन केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक नामदेवराव ठोंबळ यांनीी काम पाहिले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित बिनविरोध निवडलेले संचालक सर्वश्री. गोरख दशरथ उगले, सिताराम लक्ष्मण उगले, अशोक देवराम उगले, साहेबराव पुंजा शिंदे, प्रकाश भास्कर दवंगे, शिवनाथ उत्तम तिपायले, देवराम त्र्यंबक उगले, सौ. सुशिला रघुनाथ उगले, सौ. लता बाळू उगले यांच्यासह अध्यक्ष उपाध्ययांचा सत्कार करण्यांत आला. सत्कारास उत्तर देतांना अध्यक्ष रंगनाथ उगले म्हणाले की, संजीवनी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी सभासदांच्या योजनांची पुर्णपणे अंमलबजावणी करून संस्था विकासासाठी प्रयत्न करू शेवटी सचिव काकासाहेब भास्कर पवार यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *