वारीत महाश्रमदानातून परिसर स्वच्छता अभियान “सप्ताह 78 वा” उत्साहात संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय वारी, जय बाबाजी भक्त परिवार, वारी व राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, वारी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ( दि. 3 सप्टेंबर 2023 ) सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत तब्बल 3 तास महाश्रमदान सोहळा व परिसर स्वच्छता अभियानाचा 78 वा. सप्ताह यशस्वीपणे राबविण्यात आला.या अभियानात वारी येथील प्राथमिक शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील संकलित केलेला कचरा, प्लास्टिक पिशव्या, पेटवून दिल्या. तसेच एक ट्रॅक्टर ट्रेलर माती भरली.या स्वच्छता अभियानात स्वच्छतादूत मधुकरराव टेके, सेवानिवृत्त बँक अधिकारी रावसाहेब जगताप, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर जाधव, पंडित लकारे, पोस्टमास्तर संजय कवाडे, विलास गाडेकर, सेतू कार्यालयाचे संचालक रविंद्र टेके, पत्रकार रोहित टेके, योगेश पवार, ग्रामपंचायत कर्मचारी रावसाहेब वाघ, विलास जगधने, मच्छिंद्र गागरे यांच्यासह ग्रामस्थांनी स्वच्छतेच्या या अभियानात आपले श्रमरुपी योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *