सामाजिक उपक्रमांमध्ये कोल्हे परिवाराचे कार्य मोठे:- आप्पासाहेब दवंगे…

Uncategorized

पोहेगांव येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यात समाजातील तळागाळाच्या शेवटच्या घटकापर्यंत विविध शासकीय योजना ,दुष्काळ, पूर परिस्थिती , कोरोना काळात जम्बो कोविड सेंटर , सर्वरोग निदान शिबिर व सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा असो संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष माजी बिपिनदादा कोल्हे, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे हे आपली जबाबदारी म्हणून समाजाचे आपण काही देणे लागतो या हेतूने सामाजिक उपक्रम राबवत असतात. सामाजिक उपक्रमांमध्ये कोल्हे परिवाराचे कार्य मोठे आहे असे प्रतिपादन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी केले.ते कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन करताना बोलत होते.
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठान , माजीमंत्री शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट, डॉ. प्राची पवार यांच्या निलवंसत मेडीकल फाऊंडेशन व रिसर्च सेंटर नाशिक, मणिशंकर आय हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने पोहेगांव येथे श्यामराव गणपतराव औताडे विकास सोसायटीच्या सभागृहात मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन काल बुधवारी सकाळी दहा वाजता करण्यात आले.यावेळी संचालक अरूणराव येवले,अशोकराव औताडे, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रम पाचोरे, उपाध्यक्ष गणेश राऊत, साहेबराव पाचोरे, बापूसाहेब औताडे, रमेश औताडे, ज्ञानदेव औताडे, आप्पासाहेब औताडे, राजेंद्र औताडे, शिवाजी जावळे, शंकर औताडे ,इंद्रभान खुरसने, निखिल औताडे, कृष्‍णा औताडे, जगन्नाथ औताडे, अनिल गायकवाड,सागर रोहमारे डॉ रणजित जड्डा, डॉ महेंद्र चौधरी, डॉ मोहिनी गायकवाड आदी उपस्थित होते.आप्पासाहेब दवंगे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाल्यानंतर या शिबिरात २०६ रुग्णांनी आपल्या नेत्रांची तपासणी केली. ९० रुग्णांना संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने मोफत नंबरच्या चष्म्यांचे वाटप करण्यात आले तर मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी ५० रुग्णांची निवड करण्यात आली.नाशिक येथे या रुग्णांच्या नेत्रावर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया मणिशंकर आय हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रम पाचोरे, रमेश औताडे, राजेंद्र औताडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शेवटी आभार राजेंद्र औताडे यांनी मानले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *