आर जे एस फाउंडेशन मध्ये कायदेविषयक शिबिर संपन्न ,,जागतिक एड्स दिनानिमित्त केले होते आयोजन….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन होमिओपॅथी कॉलेज मध्ये २ डिसेंबर रोजी तालुका विधी सेवा समिती, कोपरगाव वकील संघ व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन यांच्या विद्यमाने जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून कायदेविषयक शिबिराचे आयोजन केले होते.यात जिल्हा न्यायाधीश बी.एम पाटील यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारले. प्रमुख अतिथी म्हणून न्यायाधीश भगवान पंडित,अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ए.एल वहाडणे, कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष एम.पी.येवले हे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रसंत जनार्दन स्वामी व धन्वंतरी प्रतिमेला पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश बी.एम पाटील यांनी विद्यार्थ्यांशी कायदा व एड्स विषयावर संवाद साधला.
ते म्हणाले की एडसग्रस्त रुग्णाला आपण व्यवस्थित उपचार दिले पाहिजे.त्याच्याशी इतरांप्रमाणे वागणूक दिली पाहिजे.एखादा रुग्ण एड्सग्रस्त असेल तर त्याची खरी माहिती लपवली नाही पाहिजे. डॉक्टरच्या एका चुकीमुळे एखाद्या व्यक्तीचे जीवन उध्वस्त होवू शकते.न्यायालयात डॉक्टरची साक्ष खरी धरून न्याय दिला जातो.या न्यायालयाच्या प्रक्रियेत डॉक्टर महत्वाची भूमिका बजावत असतो.नियमानुसार एड्सग्रस्त व्यक्तीला उपचार देण्यापासून टाळाटाळ करू शकत नाही.असे आढळल्यास संबधित डॉक्टरवर कारवाई होते.हे आपणं विसरू शकत नाही.म्हणून आपण पुढे शिक्षण घेवून डॉक्टर होणार आहोत.आपण सर्व नियम पाळले पाहिजे. मेडिकल बाबतीत न्यायालयात डॉक्टरची भूमिका महत्वाची असते.या वरून न्यायनिवाडा केला जातो.म्हणून डॉक्टरांनी जे खरे असेल ते सांगावे कोणाच्या बाजून बोलू नये खरी माहिती लपवू नये.जेणे करून अपराधी निरपराधी
व निरपराधी अपराधी सिद्ध होईल.असे करू नये असे मार्गदर्शन केले.
यावेळी आर जे एस फाउंडेशन अध्यक्ष चांगदेव कातकडे या उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
सूत्रसंचालन होमिपॅथीक कॉलेजच्या विद्यार्थिनी श्रुती भिंगारे व पाजक्ता इथापे यांनी केले.कार्यक्रमासाठी आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डॉ. नारायण पाटील,नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. इरशाद अली, होमिपॅथीक कॉलेजच्या प्राचार्या डॉ.सावनी यरनाळकर,एस जे एस हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.एल.एस बागडे इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
1

प्रतिक्रिया
एस जे एस हॉस्पिटल मध्ये रुग्णांना योग्य व मोफत उपचार दिले जातात. कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरलेले मशीन उपलब्ध केले आहे.यामुळे खेड्यापाड्यातील रुग्णांना मोठ्या शहरात जाण्याची गरज पडत नाही.जवळची जवळ उपचार मिळतात संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे यांचे मी कौतुक करतो
अध्यक्ष कोपरगाव वकील संघ ऍड.मनोहर येवले

  1. ↩︎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *