

कोपरगाव प्रतिनिधी:-
वारी येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री रामेश्वर विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा ७८ वा स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सकाळी प्रभात फेरी काढून स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत जनजागृती केली. गावातील जिल्हा परिषद शाळा, अंबिका दूध डेअरी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत इत्यादी ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी सहभाग घेतला. विद्यालयातील ध्वजारोहण विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री साळुंखे एस ए यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी गावातील माजी विद्यार्थी,ग्रामस्थ, शिक्षण प्रेमी नागरिक, माजी सैनिक,माजी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य श्री मच्छिंद्र टेके, माजी सरपंच श्री बद्रिनाथ जाधव, श्री सतिशराव कानडे यांच्यासह विद्यमान सरपंच योगिताताई जाधव,उपसरपंच श्री विजुभाऊ गायकवाड, सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, ग्राम विकास अधिकारी श्री दिलीप वारकर व इतर मान्यवर उपस्थित होते स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यालयाच्या एस एस सी परीक्षा मार्च २४ मधील गुणवंत विद्यार्थिनींना दि.गोदावरी बायो रिफायनरीज,साकरवाडी यांच्यावतीने देण्यात आलेल्या रोख पारितोषिकांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे गावातील शिक्षण प्रेमी ग्रामस्थ मा.श्री एम के टेकेसर यांच्या मातोश्री यांच्या पुण्यस्मरणार्थ गेल्या वर्षी इयत्ता नववी मध्ये प्रथम आलेल्या दोन विद्यार्थ्यांना रोख रक्कम अनुक्रमे 3100 व 3000 रुपये या पारितोषिकाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा माजी सैनिक श्री संदेश रामदास जाधव यांचा सत्कार करण्यात आला

या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य अँडव्होकेट शरद जोशी,श्री सुरेश जाधव, माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे,शिक्षण प्रेमी डॉ. हिमांशू त्रिवेदी,माजी सैनिक श्री संदेश जाधव हे उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यालयातील इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी भारत की बेटी या गीतावर सुंदर नृत्य सादर केले
गावातील शिक्षण प्रेमी नागरिक तथा पालक श्री जयसिंग बनगैय्या यांच्यावतीने विद्यालयास राष्ट्रध्वज सप्रेम भेट देण्यात आला

शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक वृंद श्री कैलास शेळके बाबासाहेब बर्डे,बाळासाहेब तुपे, वसंत जाधव, नारायण सूकटे, रवींद्र रासकर, तुकाराम जेठे, उपशिक्षिका सौ आशा निळे, श्रीमती शालिनी करपे, कु. अनिसा पठाण , शिक्षकेतर कर्मचारी गोरख सोनवणे, विजय थोरात यांनी परिश्रम घेतले.
