कोपरगाव मतदार संघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला करण्यात ना. आशुतोष काळे यशस्वी:- माधवराव खिलारी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर – पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यासाठी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच कार्यकर्ते पवार साहेबांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करताना त्यांच्या स्वप्नातला समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी देत असलेले मोलाचे योगदान हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे अनुभवत आहे. पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने पवार साहेबांच्या शिकवणीनुसार त्यांच्या विचारांना सोबत घेऊन ना. आशुतोष काळे यांनी देखील पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा केलेला विकास पाहता भविष्यात कोपरगाव मतदार संघ विकासाचे रोल मॉडेल म्हणून गणला जाणार आहे. मतदार संघातील जनता ना. आशुतोष काळे यांच्या कार्यपद्धतीवर समाधानी आहे. त्यांनी केलेल्या विकास कामातून सर्व नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होत असून कोपरगाव मतदार संघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला करण्यात ना.आशुतोष काळे यशस्वी झाले आहेत असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी यांनी केले आहे.
काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त कोपरगाव शहरातील गौतम बँकेच्या प्रांगणात श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजारोहण करून २३ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खिलारी बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, ना.आशुतोष काळे यांनी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करताना तळागाळातील नागरिकांना देखील विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. विकासाचे मुलभूत प्रश्न मार्गी लावले असून त्याच बरोबर पुरोगामी विचारांची जपणूक करताना सर्व समाजाला सोबत घेऊन कोपरगाव मतदार संघ राष्ट्रवादीमय केला असल्याचे सांगितले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना संचालक विठ्ठलराव आसने, शहर युवक अध्यक्ष नवाज कुरेशी सौ. प्रतिभा शिलेदार, सुनील मोकळ यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगूले, कार्याध्यक्ष संतोष चवंडके, महिला जिल्हा सचिव सौ. रेखा जगताप, शहराध्यक्षा सौ. प्रतिभा शिलेदार, राष्ट्रवादी युवक जिल्हा सचिव कृष्णा आढाव, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, युवती शहराध्यक्षा सौ. माधवी वाकचौरे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष निखिल डांगे, शहराध्यक्ष कार्तिक सरदार, सेल अध्यक्ष डॉ. तुषार गलांडे, सुनील मोकळ, जावेद शेख, रावसाहेब साठे, प्रकाश दुशिंग, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, संचालक संजय आगवन, सचिन चांदगुडे, विठ्ठलराव आसणे, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, माजी पंचायत समिती सदस्य श्रावण आसणे, राहुल जगधने, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, वर्षा गंगूले, हाजी मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, दिनकर खरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, अनिल महाले, गोदावरी केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे, ज्ञानेश्वर हाळनोर, दिलीप बोरनारे, सोमनाथ कांगणे, छगनराव देवकर, वाल्मिक नवले, वाल्मिक लहिरे, संदीप कपिले, राजेंद्र खैरनार, राजेंद्र भुजाडे, पोपटराव भुजाडे, दिनकर भुजाडे, ज्ञानेश्वर कोळपे, रावसाहेब चौधरी, माधवराव वहाडणे, विजय रक्ताटे, गोपाळ कुलकर्णी, संतोष आगवन, सोमनाथ कांदळकर, रत्नाकर धेनक, दवंगे, विकास बेंद्रे, इम्तियाज अत्तार, एकनाथ गंगूले, संदीप देवळालीकर, शैलेश साबळे, राजेंद्र आभाळे, नारायण लांडगे, अंबादास वडांगळे, उमेश दीक्षित, नितीन शेलार, प्रसाद उदावंत, शिवाराव कुऱ्हाडे, हारुण शेख, मुन्ना पठाण, किशोर डोखे, गणेश लकारे, शुभम लासुरे, किरण बागुल, संतोष शेजवळ, कालु चोपदार, महेश उदावंत, पुंडलिक वायखिंडे, गणेश बोरुडे, आकाश गायकवाड, संतोष शेलार, नितीन साबळे, विक्रम मांढरे, विजय शिंदे, राकेश शहा, विलास पाटोळे, रोशन शेजवळ, शितल वायखिंडे, शितल लोंढे, भाग्यश्री बोरुडे, उषा उदावंत, दिक्षा उनवणे, आशा पिंगळे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *