‘भुमीशोध’ अभियानात प्रसादनगरचा समावेश करावा:- आप्पासाहेब ढुस…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(अहमदनगर):-
घरकुल बांधकामासाठी जागा नसलेल्या लाभार्थीसाठी भूमीशोध अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते नुकताच शुभारंभ झाला असून दि. १० ते २५ जुन, २०२२ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार असलेने देवळाली प्रवरा हद्दीतील प्रसादनगरचा या अभियानात समावेश करावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी अहमदनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी मा. संदीप निचित साहेब यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रसंगी राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे, राहुरी तालुका कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे सचिव प्रशांत कराळे आदी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्हयातील काही लाभार्थीना घरकुल बांधकामासाठी स्वमालकीची जागा नसल्याने, या लाभार्थीना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचे हस्ते भुमीशोध अभियानाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.
सदरहू अभियान १० ते २५ जुन, २०२२ या कालावधीमध्ये राबविण्यात येणार असून. अहमदनगर जिल्हयातील सामाजीक आर्थिक जातनिहाय सर्वेक्षण बहुतेक लाभार्थीच्या प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र जागेच्या तांत्रिक अडचणीमुळे काही लाभार्थीना घरकुल बांधकामासाठी मंजुरी देणे प्रलंबीत आहे. काही लाभार्थीना घरकुल बांधकामासाठी स्वमालकीची जागा उपलब्ध नाही. या लाभार्थीना जागा उपलब्ध नसल्याने मंजुरी देता आली नाही. सदर लाभार्थीना जागा शोध मोहिम राबविण्यासाठी अभियान कालावधीत गावनिहाय पंचायत समिती स्तरावरुन एका कर्मचारी/इतर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच शंभर लाभार्थींसाठी विस्तार अधिकारी/सक्षम अधिकारी दर्जाचा एक पर्यवेक्षीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. सदर कर्मचारी, अधिकारी गावामध्ये ग्रामपंचायत मालकीच्या जागेचा त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या खुल्या जागांचा शोध घेणार आहेत. भुमीहिन लाभार्थीना सदरील जागेवरील लाभार्थींचे अतिक्रमण नियमाकुल करुन २५ जुन, २०२२ पर्यंत जागा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही भुमीशोध अभियानामध्ये करण्यात येणार असल्याने देवळाली प्रवरा येथे प्रसादनगर भागातील गट न. ५४२, ५४४ व पश्चिम बाजूच्या शिंगी प्लॉट मध्ये जवळपास ४० वर्षा पासून मागासवर्गीय बहुल झोपडपट्टी धारक वास्तव्यास आहेत. देवळाली प्रवरा नगरपालिकेनेही त्यातील काही भाग स्लॅम घोषित करणेचा प्रस्ताव दिलेला आहे. तसेच निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण धारक मागासवर्गीय असेल तर त्यांना ती जमीन विनामूल्य प्रदान करण्याची शासन निर्णयाने तरतूद आहे. मौजे देवळाली प्रवरा येथील प्रसादनगर भागातील नागरिकांना जागा त्यांचे नावावर नसलेने घरकुल बांधता येत नसलेने भूमीशोध अभिमान अंतर्गत येथील प्रसादनगर पूर्व व पश्चिम मधील अतिक्रमण केलेली झोपडपट्टी नियमाकुल करावी किंवा घरकूल साठी पत्र असलेल्या लाभार्थ्यांना या भूमी शोध अभियान अंतर्गत जागा उपलब्ध करून देणेकामी सुरू असलेल्या मोहिमेत देवळाली प्रवरा येथील पूर्व व पश्चिम प्रसादनगर झोपडपट्टी धारकांचा समावेश करणेत यावा असे ढुस यांनी निवेदनात म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *