
कोपरगाव प्रतिनीधी:-
जेष्ठ नागरिक सेवा मंच च्या वतीने, पोलीस निरीक्षक मा.वासुदेव देसले साहेब यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. सोबतच सौ. देसले ताईसाहेब, यांचेही अभिनंदन करण्यात आले…..
कोव्हिड काळा मध्ये उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन अतिशय सुंदर पध्दतीने केल्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल मा.भगतसिंग कोश्यारी यांच्या तर्फे सौ. देसले ताई यांचे, अभिनंदन व सत्कार करण्यात आला होता…
त्या प्रीत्यर्थ जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षा मा.सौ.सुधाभाभी, गुजराथीताई व रोहोमताई यांनी अभिनंदन केले .
या प्रसंगी जेष्ठ नागरिक सेवा मंच चे उत्तमभाई शहा,विजूभाऊ राठी,
डाॅ.विलास आचारी, सुवालालजी भंडारी,
मा.थोरे ,दारूवालापेंटर सुधाताई ठोळे, गुजराथीताई,रोहोमताई ई.
पदाधिकाऱ्यांसह सर्व सभासद उपस्थित होते.
मा.विजूभाऊ राठी यांनी प्रास्तविक करून मा. देसले दांपत्याचा गौरव केला. तर डाॅ.विलास आचारी यांनी आभार मानले.
