देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा पुरस्कार…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
परळी वैजनाथ येथे पार पडलेल्या महा पशुधन एक्सपो या प्रदर्शनात कृषी महाविद्यालय पुणे येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या वतीने शुद्ध देशी गोवंश सन्मान योजना पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राने देशी गोवंश जतन, संवर्धन, संशोधन, प्रशिक्षण व शेतकरी मार्गदर्शन या क्षेत्रात सातत्याने केलेल्या विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी श्री. सुनील सूर्यवंशी व श्री. नेरकर हे गोसेवा आयोगाचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.
देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने व सह-शास्त्रज्ञ डॉ. सुजित भालेराव यांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, संचालक, विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, संचालक, संशोधन डॉ. प्रशांत बोडके, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने तसेच प्राध्यापक, शास्त्रज्ञ, कर्मचारी, विद्यार्थी, गोपालक व शेतकरी यांचे कडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *