कोपरगाव तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर, तालुका क्रीडा समिती कोपरगाव आणि संजीवनी सैनिकी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका पावसाळी शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा संजीवनी सैनिकी विद्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या .
तालुक्यातील विविध माध्यमांच्या शाळांमधून 14, 17 आणि 19 वर्षातील मुलांचे 68 संघ व 37 मुलींची संघ असे एकूण 105 संघ तालुक्यातून सहभागी झालेले होते. तसेच स्पर्धेत एकूण 1250 खेळाडूंनी अभूतपूर्व सहभाग नोंदविला. सर्व कबड्डीचे सामने अतिशय चूर्शीचे होऊन निर्वीघ्न पणे संपन्न झाले आहे. सर्व खेळाडूंनी खिलाडू वृत्तीचे दर्शन घडविले आणि खेळाचा मनसोक्त आनंद घेतला . संजीवनी सैनिकी स्कूलने अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे आयोजन केले होते.
स्पर्धेले उद्घाटन मान. श्री सुमित दादा कोल्हे साहेब – विश्वस्त संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था,कोपरगाव
यांचे शुभ हस्ते संपन्न झाले . यावेळेस
संजीवनी सैनिकी स्कूलचे प्राचार्य कैलास दरेकर सर, संजीवनी इंग्लिश मेडीयम स्कूल चे प्राचार्य मोहसीन शेख सर आणि हॉस्टेल सुप्रीडेंट भास्कर सर व तालुका क्रीडा संकुल समिती सदस्य राजेंद्र पाटणकर व तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक, क्रीडा समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या स्पर्धेत विविध गटातून पुढील विद्यालयांनी प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला .
कबड्डी स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे :
१४ वर्ष
मुले –
१. छत्रपती शिवाजी विद्यालय कोळपेवाडी
२. संजीवनी सैनिकी विद्यालय कोपरगाव

मुली –
१. जिल्हा परिषद शाळा बहादरपूर
२. माध्यमिक विद्यालय ब्राह्मणगाव

१७ वर्ष
मुले –
१. आत्मा मलिक माध्यमिक विद्यालय कोकमठाण
२. शेतकरी विद्यालय जवळके

मुली –
१.आत्मा मलिक इंग्लिश मीडियम स्कूल
२.राधाबाई काळे कन्या विदयालय , कोळपेवाडी

१९ वर्ष
मुले –
१. आत्मा मलिक इंग्लिश मीडियम स्कूल कोकमठाण
२. संजीवनी जुनिअर कॉलेज कोपरगाव

मुली –
१. आत्मा मलिक इंग्लिश मीडियम स्कूल कोकमठाण
२. संजीवनी जुनियर कॉलेज कोपरगाव
सदर स्पर्धा पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील विविध क्रीडा प्रशिक्षक मार्गदर्शक शारीरिक शिक्षण शिक्षक महिला शिक्षक वर्ग यांचे मोलाचे योगदान मिळाले .
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत शेजुळ , बाजीराव गायकवाड , आहेर सर , संतोष तांदळे , प्रविण दरेकर , निलेश बडजाते , शिवराज पाळणे , अक्षय येवले , अमोल बोळीज , किरण बोळीज ,अतुल कोताडे , वसावे सर , प्रकाश शिर्के , गणेश शिरसाठ, गणेश दरेकर, पवार सर , वायाळ सर , गणेश वाकचौरे, शेख मॅडम , नाईकवाडे मॅडम , अस्मिता रायते आदी शिक्षकांचे सहकार्य लाभले .त्याचबरोबर अध्यक्ष नितीन निकम ,सचिव अनुप गिरमे , सहसचिव देवेंद्र भोये आकाश लकारे भीमाशंकर औताडे , रामदास गव्हाणे राष्ट्रीय पंच रवींद्र नेंद्रे , आण्णासाहेब गोपाल , जिल्हा संपर्कप्रमुख शिवप्रसाद घोडके यांचे सहकार्य लाभले .
तसेच स्पर्धा संपन्न करण्यासाठी संजीवनी सैनिकी विद्यालय चे सन्माननीय मार्गदर्शक प्राचार्य,स्पर्धा प्रमुख पवन शिरसाठ , उमेश उशिर , कोल्हे सर यांचे मोलाचे आणि विशेष सहकार्य लाभले.
अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात सर्व स्पर्धा संपन्न झाल्या. सर्व विजय संघांचे अभिनंदन करून त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *