मनुष्याने सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक कार्यात व्यस्त रहावे:- अॅड किरण म्हस्के…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनीधी:-
प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षणानंतर कौटूंबिक जबाबदारी येते त्यातून नौकरीची धडपड सुरू होते, पुढे सेवानिवृत्ती होते. मनुष्याने सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक कार्यात व्यस्त रहावे असे प्रतिपादन विधीज्ञ किरण म्हस्के यांनी केले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या कायदा विभागाचे कर्मचारी मच्छिंद्र द्वारकानाथ उर्फ एम.डी. वक्ते सेवानिवृत्त झाले त्याबद्दल त्यांचा सत्कार करतांना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अचलगांव सोसायटीचे अध्यक्ष सुभाष शिंदे होते. प्रारंभी एल आय सी चे गोरक्षनाथ कदम व विरेंद्र जोशी यांनी प्रास्तविक केले. मच्छिंद्र वक्ते यांनी नॅशनल हेवी इंजिनीयरींगनंतर संजीवनी ट्रस्ट, कपार्ट योजना, सहकारी पाणीवापर संस्था, कोपरगांव तालुका क्रीडा संकुल, कारखाना स्थावर माहिती बाबतचे अद्यावत रेकॉर्ड, साखर कारखान्यांच्या कायदा व कार्यालयीन विभागात २४ वर्षे अत्यंत जबाबदारीने काम केले त्यातून असंख्य मित्र परिवार जोडला. सत्कारास उत्तर देतांना मच्छिंद्र वक्ते म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समूहाची उभारणी केली. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी या संस्थेचा नावलौकिक वाढविण्यावर भर देत कामगारांसाठी त्यांची सातत्याने सुरु असलेली धडपड हीच आमच्या सेवानिवृत्तीनंतरची मोठी पुंजी आहे, त्यांच्या कार्यातूनच कोपरगांव तालुक्याच्या प्रत्येक अडचनीत मार्ग सापडत असतो. संजीवनी ही तालुक्याची मोठी कामधेनू आहे. एम डी वक्ते यांच्या सेवानिवृत्तीबद्दल कोल्हे कारखान्यांचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, बाळासाहेब वक्ते, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, सचिव तुळशीराम कानवडे, उद्योगपती कैलास ठोळे, विधीज्ञ एस.डी. कुलकणी, रासायनिक विभागाचे कार्यालयीन अधिक्षक धनुभाऊ होन, बाजीराव उगले, परचेस ऑफिसर भाऊसाहेब दवंगे, विधिज्ञ बाळासाहेब देशमुख, कल्याण येथील उद्योजक व परमेश्वरी लॉन्सचे मालक साहेबराव चव्हाण, स्वीय सहाय्यक आयुब पठाण आदिंनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास बाबा कोल्हे, गव्हाळे बाबा, बाळासाहेब बोरसे, भास्कराव झगडे, मोहित कोल्हे, राहुल उगले, सचिन भालके, मच्छिंद्र शिंदे, विलास सानप आदी उपस्थित होते. शेवटी राहुल उगले यांनी आभार मानले.

फोटो ओळी:- कोपरगाव
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या कायदा विभागाचे कर्मचारी मच्छिंद्र द्वारकानाथ उर्फ एम.डी. वक्ते सेवानिवृत्त झाले त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *