कोळपेवाडी विकासाच्या बाबतीत अव्वल रुग्णवाहिका घेवून आदर्श निर्माण केला:- ना. आशुतोष काळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- आपले आरोग्य देखील किती महत्वाचे आहे हे जीवघेण्या कोरोना महामारीत आपण अनुभवले आहे. रुग्णांना उपचारासाठी वेळेवर रुग्णवाहिका अथवा वाहन सुविधा मिळाली नाही तर वेळप्रसंगी रुग्णाला आपला जीव देखील गमवावा लागतो. याची काळजी घेत ग्रामस्थांना वेळेवर रुग्णसेवा उपलब्ध व्हावी यासाठी कोळपेवाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून ग्रामविकासाबरोबरच ग्रामपंचायतीच्या स्वमालकीची रुग्णवाहिका घेवून आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले.


कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत १ कोटी २१ लाखाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीवर साकारण्यात आलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या शिल्पाचे अनावरण तसेच ग्रामपंचायत रुग्णवाहिका, पशुवैद्यकीय दवाखाना व जिल्हा परिषद उर्दू शाळा खोल्यांचे लोकापर्ण व जिल्हा परिषद शाळा खोल्यांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी पुढे बोलतांना ना. आशुतोष काळे म्हणाले की, तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्यशासन मोठ्या प्रमाणावर निधी देते. कोपरगाव तालुक्यातील प्रसिद्ध असलेला सर्वात मोठा यात्रोत्सव व कोळपेवाडीसह पंचक्रोशीतील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत श्री महेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. पर्यटन व ग्रामविकास विभागाकडून देखील श्री महेश्वर देवस्थानास निधी देवून देवस्थानचा विकास करणार असल्याचे सांगत ग्रामस्थांच्या मागणीवरून तलावाला देखील सुरक्षा कंपाऊंड बांधण्यासाठी निधी देवू. भविष्यात श्री महेश्वर देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा देखील कसा मिळेल व परिसराचा जास्तीत जास्त विकास कसा साधता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. एका वेळी १ कोटी २१ लाखांची विकास कामे कोळपेवाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केल्याबद्दल ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे कौतुक करून कोळपेवाडीगाव विकासाच्या बाबतीत निश्चितपणे अव्वल आहे अशी शाबासकी दिली.
याप्रसंगी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, कचरू कोळपे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक व कोळपेवाडीचे लोकनियुक्त सरपंच सूर्यभान कोळपे, ज्ञानेश्वर हाळनोर, गोरक्षनाथ कोळपे, वसंतराव कोळपे, ज्ञानेश्वर कोळपे, जनार्दन कोळपे, हौशीराम कोळपे, विलास कोळपे, डॉ. आय. के. सय्यद, शकील पटेल, राजू कोळपे, नवनाथ ढोणे, दत्तात्रय कोळपे, शिवाजी कोळपे, महेश कोळपे, गोरख कोळपे,रामदास कोळपे, रमेश टिक्कल, आदिनाथ कोळपे, गणेश धायगुडे, सचिन कोळपे, सागरजी कोळपे, प्रथमेश कोळपे, प्रतिक कोळपे, रवींद्र कोळपे, प्रशांत कोळपे, विक्रम कोळपे, सोमनाथ कोळपे, गणेश पारचे, प्रभाकर चांडे, सुनील कोळपे, नंदू कोळपे, पं. स. अभियंता उत्तम पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, पं. स. पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रद्धा काटे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.दिलीप जामदार, विस्तार अधिकारी बबनराव वाघमोडे, डी. ओ. रानमाळ, ग्रामविकास अधिकारी गोरक्षनाथ शेळके आदींसह कोळपेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट :- कोळपेवाडी सह पंचक्रोशीतील मुस्लीम समाजाचे धार्मिक विधी व विविध कार्यक्रमासाठी मुस्लीम समाजाची कोळपेवाडी येथे सांस्कृतिक भवनाची मागणी असून त्यांच्याकडे स्वमालकीची जागा देखील उपलब्ध आहे. त्या ठिकाणी अद्यावत सुख-सोयींनी युक्त सांस्कृतिक भवन बांधून देण्यासाठी अल्पसंख्यांक विभागाकडून निधी देणार.- ना. आशुतोष काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *