कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाच्या विजेच्या समस्यांमुळे वीज ग्राहकांना होणारा त्रास दूर होवून पूर्ण दाबाने वीजपुरवठा व्हावा यसाठी रवंदे, वारी, या सबस्टेशनची क्षमता वाढवून कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी, पोहेगाव, चास नळी हि सबस्टेशन शहा येथील १३२ के.व्ही.ए. सबस्टेशनला जोडली जाणार आहेत. तसेच ब्राम्हणगाव व परिसरातील गावांचा विजेचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी ब्राम्हणगाव सबस्टेशनसाठी ३ कोटी रुपये निधी दिला आहे. येत्या काही दिवसात ब्राम्हणगाव सबस्टेशनचे काम पूर्ण होवून ब्राम्हणगाव व परिसरातील गावांच्या विजेच्या समस्या कायमच्या सुटणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या ३ कोटी निधीतून सुरु असलेल्या ब्राह्मणगाव सबस्टेशनच्या ११ किमी ३३ के.व्ही. लाईन टाकणे, ५ एम.व्ही.ए. ट्रान्सफॉर्मर बसवणे ई. कामांची व तीर्थक्षेत्र विकास निधीअंतर्गत ५० लक्ष रुपये निधीतून सुरु असलेल्या श्री जगदंबा माता मंदिराच्या कामाची पाहणी केली. तसेच ब्राह्मणगाव येथे १० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या आहेर वस्ती ते बदापुर रस्ता खडीकरण कामाचे व ७ लक्ष रुपये निधीतून बसवण्यात आलेल्या ओपन जिम साहित्याचे लोकार्पण आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले की, ब्राम्हणगाव व परिसरातील रस्त्यांच्या विकासासाठी निधी देवून नागरिकांच्या रस्त्याच्या अडचणी दूर केल्या आहेत. परंतु अजूनही काही रस्त्यांचा विकास होणे बाकी असून या रस्त्यांचे प्रस्ताव शासन दरबारी मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून लवकरच सर्वच रस्त्यांचा विकास होवून नागरिकांच्या अडचणी सुटणार आहेत. ब्राम्हणगाव व परिसराचा विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी ब्राह्मणगाव सबस्टेशनला ३ कोटी निधी दिला असून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात हे काम पूर्ण होवून विजेचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. यावेळी राजभवनात जनसंपर्क अधिकारी सहाय्यक म्हणून निवड झाल्याबद्दल सीताराम पवार व पोलीस दलात निवड झाल्याबद्दल किरण माळी यांचा आ. आशुतोष काळे यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रावण आसने, अनिल कदम, माजी संचालक विठ्ठलराव आसने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजीराव देवकर, जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे संचालक ज्ञानदेव गवारे, गौतम बँकेचे संचालक तुकाराम उळेकर, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक गणेश आहेर, किसन आहेर, विलास साबळे, सचिन आसने, रविंद्र पिंपरकर, विठ्ठल शिंदे, सचिन कांबळे, बाबासाहेब जगताप, शशिकांत देवकर, रमेश बर्डे, सीताराम पवार, बबन माकोने, गणेश पळसकर, किरण कुदळे, सीताराम आहेर, बाबासाहेब आसने, अशोक शिरसाठ, अंबादास वायखिंडे, निलेश कुलकर्णी, देवीदास आहेर, विलास मोरे, चांगदेव आसने, बाळासाहेब देवकर, बाबासाहेब गायकवाड, अशोक बनकर, नानासाहेब सोनवणे, गणेश वाकचौरे, वाल्मिक जगधने, किरण मोरे, जालिंदर उळेकर, भूषण कुलकर्णी, पांडुरंग सोनवणे, सर्जेराव घायतडकर, विकास बेंद्रे, मुकुंद इंगळे, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण राठोड, सहाय्यक अभियंता किशोर घुमरे, अनिकेत निरभवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता गौरव सोनवणे, पाटबंधारे विभागाचे सुनील काळे, साईदीप इलेक्ट्रीकलचे संदीप भेडांगे, सचिन दारोकर, ग्रामसेवक विजय पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळ- ३ कोटी निधीतून पूर्णत्वाकडे असलेल्या ब्राम्हणगाव सबस्टेशनच्या कामाचा आढावा घेतांना आ.आशुतोष काळे.
